तीन वेळा लँडिंगचा प्रयत्न निष्फळ, विमान तासभर हवेतच, प्रवासी अक्षरक्ष: रडले, अहमदाबाद-जैसलमेर फ्लाईटच्या प्रवाशांना भयानक अनुभव

कुणासोबत कधी काय घडेल, हे कधीच सांगता येणार नाही. कधीकधी असं काहीसं घडतं की ज्याची आपण कधीच कल्पनाही केली नसेल (spicejet plane landing problem passengers panic in ahmedabad jaisalmer flight).

तीन वेळा लँडिंगचा प्रयत्न निष्फळ, विमान तासभर हवेतच, प्रवासी अक्षरक्ष: रडले, अहमदाबाद-जैसलमेर फ्लाईटच्या प्रवाशांना भयानक अनुभव
आता विमानात बसून बुक करता येणार टॅक्सी, या विमान कंपनीने सुरू केली ही सेवा
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 6:53 PM

जोधपूर : कुणासोबत कधी काय घडेल, हे कधीच सांगता येणार नाही. कधीकधी असं काहीसं घडतं की ज्याची आपण कधीच कल्पनाही केली नसेल. असाच काहीसा अनुभव शनिवारी (20 मार्च) अहमदाबाद-जैसलमेर फ्लाईटमध्ये बसलेल्या प्रवाशांना आला. पायलटने त्यांचं विमान राजस्थानच्या जैसलमेर विमानतळावर लँड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही तांत्रिक कारनास्तव ते लँड होऊ शकलं नाही. पायलटने पुन्हा लँड करण्याचा प्रयत्न केला. पायलटने पुन्हा आकाशात झेप घेतली. त्यानंतर पुन्हा विमान लँड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा तीच समस्या झाली. त्यामुळे दुसराही प्रयत्न अयशस्वी ठरला. पायलटने पुन्हा तिसरा प्रयत्न केला. पण तिसराही प्रयत्न यशस्वी न झाल्याने विमानाला अहमदाबादला आणलं गेलं. यावेळी प्रवाशांची झालेली मानसिक अवस्था शब्दातही मांडता येणार नाही (spicejet plane landing problem passengers panic in ahmedabad jaisalmer flight).

नेमकं काय घडलं?

स्पाईसजेटचं एसजी 3012 फ्लाईटने शनिवारी दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी अहमदाबादच्या विमानतळावरुन जैसलमेरच्या दिशेला उड्डाण घेतली. हे विमान जवळपास दुपारी एक वाजेच्या सुमारास जैसलमेरच्या विमानतळाजवळ पोहोचलं. पायलटकडून तीनवेळा सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न केला गेला. मात्र, तांत्रिक कारणामुळे विमानाचं लँडिंग होऊ शकलं नाही (spicejet plane landing problem passengers panic in ahmedabad jaisalmer flight).

जैसलमेरमध्ये संध्याकाळी विमानाची लँडिंग

जैसलमेरच्या विमानतळाजवळ विमान जवळपास एक तास हवेत घिरक्या मारत होतं. तरीही पायलटने धीर सोडला नाही. त्यानंतर पुन्हा अहमदाबादला विमान नेण्यात आलं. तिथे दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी सुरक्षित लँडिंग करण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी दुसऱ्या पायलटद्वारे पुन्हा जैसलमेरच्या दिशेला विमानाने उड्डाण घेतली. तिथे संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी सुरक्षित लँडिंग करण्यात आली. तेव्हा प्रवाशांनी सूटकेचा श्वास सोडला.

प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

पायलटने विमान तीन वेळा लँड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. ते विमान तीन वेळा आकाशात झेपावलं. जवळपास तासभर विमान आकाशात घिरट्या मारत होतं. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. प्रवासी प्रचंड चिंतातूर झाले. काही प्रवासी तर अक्षरक्ष: रडायला लागले. यामध्ये महिला प्रवाशांची संख्या जास्त होती. या सर्व भयावह परिस्थितीत वैमानिकाने धैर्य सोडलं नाही.

हेही वाचा : Kolhapur bomb | गावठी बॉम्बने रुग्णालय उडवून देण्याचा प्रयत्न, मोठा अनर्थ टळला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.