Ram mandir : राममंदिराच्या मुद्द्यावर समाजवादी पक्षात फूट, भरसभागृहात पाहा काय घडलं
५०० वर्षानंतर अयोध्येत श्री रामांचे मंदिर बनले आहे. जगभरातून लोकं रामलल्लाच्या दर्शनासाठी येत आहेत. याच मुद्द्यावर अर्थमंत्री यांनी सोमवारी राम मंदिराचे निर्माण झाल्याने पंतप्रधान मोदी यांचा अभिनंदन प्रस्ताव सभागृहात मांडला. पण यावरुन समाजवादी पक्षात फूट पडलेली पाहायला मिळाली.
Ram mandir : 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या नंतर सोमवारी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीएम योगी आदित्यनाथ यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावावरुन मात्र समाजवादी पक्षात फूट पडलेली पाहायला मिळालं. कारण या अभिनंदन संदेशाच्या विरोधात सपाच्या 14 आमदारांनी हात वर केले. मात्र, सपाच्या इतर सर्व आमदारांनी त्याला विरोध केला नाही.
अर्थमंत्री खन्ना यांनी मांडला अभिनंदन प्रस्ताव
सोमवारी अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी विधानसभेत राम मंदिराच्या उभारणीबद्दल पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्यासाठी अभिनंदनाचा संदेश पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ते म्हणाले की, 500 वर्षांच्या संघर्ष आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राम मंदिराची निर्मिती होत आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान झालेत. या शतकातील ही सर्वात मोठी घटना आहे. अनेक वर्षांनंतर आमचा अभिमान परत आला आहे.
विधासभेत समाजवादी पक्षात फूट
विधानसभेत अर्थमंत्र्यांच्या या प्रस्तावावर सभापती सतीश महाना यांनी मतदान घेतले. या प्रस्तावाचे समर्थन करणाऱ्यांनी हो म्हणावे, असे ते म्हणाले. भाजप, अपना दल, सुभाष आणि निषाद पक्षाच्या आमदारांनी याला पाठिंबा दिला. फक्त बसप आमदार उमाशंकर सिंह यांनी पाठिंबा दिला. मात्र या प्रस्तावावरून सपामध्ये फूट पडली.
याला विरोध करणाऱ्यांनी हात वर करावे, असे सतीश महाना म्हणाले. यावर सपा आमदार लालजी वर्मा, स्वामी ओमवेश, मनोज पारस यांच्यासह 14 आमदारांनी हात वर करून निषेध व्यक्त केला. त्यानंतर हे 14 सदस्य वगळता संपूर्ण सभागृहाच्या संमतीने अभिनंदनाचा संदेश मंजूर करण्यात आला.
उत्तर प्रदेशचा अर्थसंकल्प सोमवारीच सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प आजपर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प होता. ज्यामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या.
२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. यानंतर जगभरातून लोकं अयोध्येत येत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले असून करोडो रुपयांचे दान केले आहेत. अयोध्येला यामुळे वेगळं महत्त्व आले आहे. यामुळे उत्तर प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ होणार आहे.