क्रीडा मंत्रालयाचा आदेश पाळण्यास बृजभूषण यांचा नकार, राजीनामा देणार नाही
गुन्हेगार बनून मी राजीनामा देऊ शकत नाही. मी कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. 22 जानेवारीपासून ही बैठक होणार आहे. महासंघावर जे काही आरोप झाले आहेत, ते आम्ही कार्यकारिणीसमोर ठेवू आणि नंतर निर्णय निर्णय घेऊ.
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर देशातील स्टार महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. टोकिओ ऑलम्पिक स्पर्धेत कांस्य पदक विजेता बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेत्या महिला पैलवान विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांच्यासह अनेक पैलवानांनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैगिंक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर क्रीडा मंत्रालयाने त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहे.
क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur)यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री बजरंग पूनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक व रवी दहिया यासह इतर मल्लांची बैठक झाली. या बैठकीनंतर कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना २४ तासांत राजीनामा देण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत. मात्र, बृजभूषण सिंह राजीनामा देण्यास तयार नाहीत. 22 जानेवारीला क्रीडा महासंघाच्या तातडीच्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या मुदतीत राजीनामा न दिल्यास त्यांना पदावरून दूर केले जाईल, असे मानले जात आहे.
काय म्हणातात बृजभूषण :
बृजभूषण सिंह म्हणाले, “गुन्हेगार बनून मी राजीनामा देऊ शकत नाही. मी कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. 22 जानेवारीपासून ही बैठक होणार आहे. महासंघावर जे काही आरोप झाले आहेत, ते आम्ही कार्यकारिणीसमोर ठेवू आणि नंतर निर्णय निर्णय घेऊ.”
ते म्हणाले, “हे खेळाडू दीपेंद्र सिंग हुड्डा आणि काँग्रेसच्या हातातले प्यादे आहेत. दिल्लीत काँग्रेसचे सरकार असताना २०१२ च्या निवडणुकीत मी दीपेंद्र हुड्डा यांचा पराभव केला होता. हा केवळ माझ्यावरच नाही तर भाजपवरही हल्ला आहे. ”
काय आहे प्रकरण :
देशभरातील अनेक पैलवानांनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैगिंक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. बजरंग पूनिया, विनेश फोगाट, आसू मलिक, साक्षी मलिक, सत्यव्रत कादियान, अंतिम पंघाल, रवि दहिया, दीपक पूनिया, संगीता फोगाट, सरिता मोर, सोनम मलिक, महावीर फोगाट, कुलदीप मलिक यांच्यांसह जवळपास ३० पैलवान धरणे आंदोलन करत आहेत. कोणत्या प्रमुख खेळाडूंनी आरोप केले आहेत.
बजरंग पूनिया टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत रजत पदक विजेता खेळाडू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत चार पदक मिळवले आहे. साक्षी मलिक रियो ऑलंपिक पदक विजेता खेळाडू आहे. २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक पटकवले होते. आशिया कुस्ती स्पर्धेत कास्य पदक जिंकला आहे.