खळबळजनक! श्रीनगरच्या लाल चौकात भर मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ला, अनेक जण जखमी
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये लाल चौकात हँड ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींचा आकडा वाढण्याची भीतीदेखील वर्तवली जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांकडून हँड ग्रेनेडद्वारे हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 6 स्थानिक नागरीक जखमी झाल्याची माहिती आहे. मोठ्या स्फोटानंतर लाल चौकात मोठी खळबळ उडाली. लाल चौक हा परिसर खरंतर प्रचंड रहदारीचा परिसर आहे. या परिसरात अचानक ग्रेनेडचा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. लाल चौकात दर रविवारी संडे मार्केट असते. प्रचंड गर्दीने मार्केट भरलेली असताना दहशतवाद्यांकडून या ठिकाणी हँड ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. पोलीस तातडीने घटनास्थळी कामाला लागले आहेत. पोलिसांकडून तपास सुरु झाला आहे. दरम्यान, या हल्ल्यात आतापर्यंत 6 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जम्मू-काश्मीरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक मिस्टीरियस ब्लास्ट होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित घटना ही दहशतवादी असल्याचा दावा केला जातोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट झालेल्या परिसराला पोलिसांनी चारही बाजूंनी घेरलं आहे आणि संबंधित परिसर सील करण्यात आला आहे.
#WATCH | Jammu and Kashmir: Militants hurled grenade at TRC, Sunday market in Srinagar. More details awaited. pic.twitter.com/97EGapejDT
— ANI (@ANI) November 3, 2024
गेल्या 48 तासात 3 दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगरच्या खानयार परिसरात काल शनिवारी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय सैन्याच्या जवानांनी लष्कर-ए-तोयब्बाचा कमांडर उस्मान याला कंठस्नान घातलं होतं. उस्मानला सजाद गुल या दहशतवाद्याचा उजवा हात समजलं जात होतं. उस्मानचा कोड नेम ‘छोटा वालिद’ असं होतं. या छोटा वालिदला सुरक्षादलाच्या जवानांनी यमसदनी पाठवलं आहे.
उस्मान हा लष्कर-ए-तोयब्बाचा काश्मीरमधील सर्वात सिनियर कमांडर मानला जात होता. सुरक्षा दलाला उस्मानच्या मृतदेहासोबत मोठ्या प्रमाणा दारुगोळा मिळाला आहे. दरम्यान, गेल्या 48 तासांमध्ये काश्मीरमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक झाली आहे. या चकमकीत आतापर्यंत 3 दहशतवाद्यांना संपवण्यात आलं आहे. श्रीनगर, बांदीपोरा आणि अनंतनाग या भागात दोन्ही बाजूने चकमक झाली आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे.