सृष्टी गोस्वामी होणार उत्तराखंडची एक दिवसाची मुख्यमंत्री; विधानसभेलाही संबोधित करणार
उत्तराखंडमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीला एका दिवसाची मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे दिवसभरात ती सनदी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विधानसभेला संबोधितही करणार आहे. (Srishti Goswami set to become Chief Minister of Uttarakhand on January 24)
हरिद्वार: ‘नायक’ सिनेमात अभिनेता अनिल कपूरला आपण एक दिवसाचा मुख्यमंत्री होताना पाहिले. एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यावर अनिल कपूरने या एका दिवसात धडाडीचे निर्णय घेतानाही आपण पाहिले. हा सिनेमा पाहिल्यावर प्रत्यक्षात अशी घटना घडूच शकत नाही, असं तुम्हाला वाटलं असेल. पण ही गोष्ट प्रत्यक्षात घडू शकते. विश्वास बसत नाहीये ना..? पण ते खरं आहे. उत्तराखंडमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीला एका दिवसाची मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे दिवसभरात ती सनदी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विधानसभेला संबोधितही करणार आहे. (Srishti Goswami set to become Chief Minister of Uttarakhand on January 24)
सृष्टी गोस्वामी असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. ती हरिद्वारच्या बहादूराबाद ब्लॉकच्या दौलतपूरची रहिवासी आहे. 24 जानेवारी रोजी सृष्टी एक दिवसाची मुख्यमंत्री होणार आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनीही त्याला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री असताना आणखी एक व्यक्ती एक दिवसासाठी राज्याची मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
म्हणून मुख्यमंत्री होणार
येत्या 24 जानेवारी रोजी बालिका दिवस आहे. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी हुशार विद्यार्थीनीला एक दिवसाची मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सृष्टीला एक दिवसाची मुख्यमंत्री करण्यात येणार आहे. एक दिवसाची मुख्यमंत्री झाल्यानंतर ती उत्तराखंडच्या विकास कार्याची समीक्षा करेल. त्यानंतर 12 विभागाचे अधिकारी त्यांच्या विभागातील योजनांचे पाच-पाच मिनिटांसाठी सादरीकरण करतील. त्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून ते 3 वाजपर्यंत विधानसभा भरणार असून विधानसभेला ती संबोधित करणार आहे.
घरी किराणा दुकान
सृष्टीचे वडील प्रवीण पुरी दौलतपूर येथे किराणा स्टोअर्स चालवतता. तर आई सुधा गोस्वामी गृहिणी आहेत. 2018मध्ये सृष्टी गोस्वामीला बाल विधानसभा संघटनेत बाल आमदार म्हणून निवडण्यात आलं होतं. ज्या पदावर पोहोचण्यासाठी लोक स्वप्न पाहतात. त्या ठिकाणी आज माझी मुलगी पोहोचली आहे. हे पाहून अभिमान वाटतो. माझी मुलगी एका दिवसासाठी का होईना राज्याची मुख्यमंत्री होत आहे. हे देशात पहिल्यांदाच घडणार आहे, असं प्रवीण म्हणाले. (Srishti Goswami set to become Chief Minister of Uttarakhand on January 24)
अधिकाऱ्यांना सूचना देणार
आईवडिलांनी मुलींना कधीही प्रगती करण्यापासून रोखू नये, हाच संदेश या घटनेतून मिळेल, असं सृष्टीची आई सुधा गोस्वामी यांनी सांगितलं. सृष्टी सध्या रुडकी येथील बीएसएम पीजी कॉलेजातून बीएससी अॅग्रीकल्चरला आहे. एका दिवसाच्या मुख्यमंत्रीदाच्या कार्यकाळात विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना काही सूचना देण्यावर आपला भर असेल असं सृष्टीने सांगितलं. (Srishti Goswami set to become Chief Minister of Uttarakhand on January 24)
VIDEO : Sharad Pawar | धनंजय मुंडे प्रकरणात खोलात जाण्याचा आमचा निष्कर्ष प्रथमदर्शनी योग्यच : शरद पवारhttps://t.co/f9OjW7ZpuD
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 22, 2021
संबंधित बातम्या:
Christine Dacera | एअरहॉस्टेस गँगरेप-हत्या प्रकरणात ट्विस्ट, बाराही संशयित ‘गे’ असल्याचा दावा
झटपट श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ अब्जाधीशाला आयडिया द्या; 730 कोटी रुपये मिळवा!
PHOTO | 19 वर्षांची ‘जगातील सर्वात सुंदर मुलगी’, 36 वर्षांच्या अब्जाधीशाला करतेय डेट!
(Srishti Goswami set to become Chief Minister of Uttarakhand on January 24)