Mamata Banerjee | ममता बॅनर्जी खरच घरात पडल्या की कोणी त्यांना…डॉक्टरांचा खळबळजनक दावा
Mamata Banerjee | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काल घरात पडल्या. त्यांच्या कपाळाला गंभीर जखम झालीय. ममता बॅनर्जी यांच्यासोबत नेमकं घरी काय घडलं? संशयाला बळ देणारी नवीन माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी एक स्टेटमेंट केल्यानंतर रात्री 11 च्या सुमारास सगळीच थिअरची बदलली.
कोलकाता : तृणमुल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी काल घरात पडल्या. त्यांच्या कपाळाला गंभीर जखम झाली आहे. ममता बॅनर्जी यांना गुरुवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास कलकत्ता येथील SSKM रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं. डॉक्टरांनी सर्वप्रथम त्यांच्या कपाळामधून होणारा रक्तस्त्राव थांबवला. त्यानंतर तीन टाके घालून पट्टी लावली. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. सध्या सर्वच पक्षांची लोकसभा निवडणुकीची धावपळ सुरु आहे. ममता बॅनर्जी यांच्या नाकाच्या इथेही जखम झाली होती. तिथेही एक टाका घालण्यात आला. SSKM रुग्णालयात ममता बॅनर्जी यांच सीटी स्कॅन आणि एमआरआय करण्यात आला. ममता बॅनर्जी यांना रुग्णालयात दाखल केलं नाही. रात्री 9.45 च्या सुमारास त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं.
ममता बॅनर्जी कोलकाता कालीघाट येथे राहतात. “ममता बॅनर्जी घरात पडल्या तो अपघात होता की, अचानक त्यांच्या रक्तदाबात काही चढ-उतार झाले हे आम्हाला शोधून काढायचय” असं आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं. बेडरुममध्ये प्रवेश करताना ममता बॅनर्जी कशाला तरी धडकून चेहऱ्यावर पडल्या असतील ही थिअरी रात्री 11 च्या सुमारास बदलली. SSKM हॉस्पिटलचे संचालक मनीमोय बंदोपाध्याय म्हणाले की, ममता बॅनर्जी यांना कोणीतरी ढकलल्यामुळे त्या पडल्या असाव्यात असं म्हटलय. मनीमोय बंदोपाध्याय ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीबद्दल बोलले पण त्यांनी सविस्तर काही सांगितलं नाही.
नातेवाईकाकडून कारस्थानच्या थिअरीला बळ
“ममता बॅनर्जी यांचं ECG आणि सीटी स्कॅन करण्यात आलं. ममता बॅनर्जी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांना त्यांच्या देखरेखीखाली उपचार करायचे होते. त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी घरी जाण्याला प्राधान्य दिलं. ममता बॅनर्जी यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात येईल. आज पुन्हा त्यांची तपासणी होणार आहे” असं बंदोपाध्याय यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी यांची नातेवाईक काजरी बॅनर्जी यांनी कारस्थानाच्या थिअरीला बळ दिलं. धक्का बसल्यानंतर दीदी कोसळल्याचा आवाज मी ऐकला. “हे घडलं त्यावेळी मी घरी नव्हतो, पण मी माझ्या पत्नीशी बोललो” असं काजरी यांचे पती कार्तिक बॅनर्जीने सांगितलं.