सुरत रेल्वे स्थानकावर खळबळ! धावपळ, चेंगराचेंगरी आणि हाहा:कार

| Updated on: Nov 11, 2023 | 5:32 PM

सुरत रेल्वे स्थानकावर आज अचानक खळबळ उडाली. दिवाळीच्या निमित्ताने आपापल्या घरी गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी सुरत रेल्वे स्थानकावर होत आहे. या गर्दीमुळे ताप्ती गंगा एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर आली तेव्हा चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

सुरत रेल्वे स्थानकावर खळबळ! धावपळ, चेंगराचेंगरी आणि हाहा:कार
Follow us on

सुरत | 11 नोव्हेंबर 2023 : गुजरातच्या सुरत रेल्वे स्थानकावर एक अनपेक्षित घटना घडली आहे. देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. दिवाळीच्या निमित्ताने काही शहरांमधील कामगार आपापल्या गावी घराकडे निघाले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर मोठी गर्दी बघायला मिळत आहे. त्यातूनत सुरत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून जखमी प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अनेकांना श्वास घेण्यास अडचणी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी ज्या प्रवाशांना त्रास होतोय त्यांना पाणी देवून त्यांची विचारपूस केलीय. तसेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलंय.

सुरत रेल्वे स्थानकावर बिहारच्या छपरा येथे जाण्यासाठी ताप्ती गंगा एक्सप्रेस आली होती. यावेळी ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी झुंबड उडाली. प्रवाशांची मोठी गर्दी गाडी पकडण्यासाठी आली. यावेळी प्रवासी एकमेकांना धक्का देत पुढे जात होते. त्यामुळे अचानक चेंगराचेंगरी झाली. यावेळी मोठी खळबळ उडाली. काही कळायच्या हात चेंगराचेंगरी इतकी भयानक झाली की एकाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांकडून कसंतरी परिस्थिती नियंत्रणात मिळवण्याचे प्रयत्न सुरु झाले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर काही प्रवासी एक्सप्रेसमध्ये बसले.

धावपळीचा व्हिडीओ समोर

सुरत शहर कापड उद्योग, हिरे आणि कॅमेकल उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील हजारो नागरीक इथे मजुरीसाठी येतात. सध्या दिवाळीचा सण आहे. तसेच नंतर छठपूजेचा सण येणार आहे. या सणांच्या निमित्ताने युपी, बिहारचे मजूर आपापल्या घरी गावी जाण्यासाठी रवाना होत आहेत. या दरम्यान सुरत रेल्वे स्टेशनवर जास्त गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची मोठी घटना घडली.

रेल्वे स्थावकावरील प्रवाशांच्या धावपळीचे व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत काही प्रवासी बेशुद्ध अवस्थेत दिसत आहेत. पोलीस या प्रवाशांना मदत करताना दिसत आहेत. फलटावर प्रवाशांचे बूट आणि चप्पलही पसरलेले दिसत आहेत.

अनेक प्रवासी 24 तासांपासून रांगेत

विशेष म्हणजे रेल्वे पकडण्यासाठी अनेक प्रवासी हे गेल्या 24 तासांपासून रांगेत उभे आहेत. तर काही प्रवासी गेल्या 48 तासांपासून रांगेत उभे आहेत. काही प्रवाशांना गाडी सापडली आहे. पण काही प्रवाशांना गाडीत शिरता आलेलं नाही. त्यामुळे ते अजूनही रांगेतच उभे आहेत. काही रेल्वे गाड्या या आधीच भरुन येत आहेत. त्यामुळे प्रचंड भरगच्च गर्दीत प्रवाशांना प्रवास करावा लागतोय.