Vir Das: भारतीयांबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर स्टँड-अप कॉमेडियन वीर दासवर होतेय जगभरातील भारतीयांकडून टीका

वीर दासने दोन दिवसांपूर्वी त्याचा अमेरिकेतल्या शोमध्ये भारतीयांबद्दल केलेत्या वक्तव्यानंतर, जगभरातील भारतीयांकडून टीका केली जात आहे. जॉन एफ. केनेडी सेंटरच्या त्याच्या शोच्या शेवटी, त्यानी 'Two India' (दोन भारत) या शीर्षकाखाली एकपात्री प्रयोग सादर केला होता.

Vir Das: भारतीयांबद्दलच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर स्टँड-अप कॉमेडियन वीर दासवर होतेय जगभरातील भारतीयांकडून टीका
Vir Das
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 7:00 AM

लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास पुन्हा एकदा वादात सापडला आहे. वीर दासने दोन दिवसांपूर्वी त्याचा अमेरिकेतल्या शोमध्ये भारतीयांबद्दल केलेत्या वक्तव्यानंतर, जगभरातील भारतीयांकडून त्याच्यावर टीका केली जात आहे.

जॉन एफ. केनेडी सेंटरच्या त्याच्या शोच्या शेवटी, त्यानी ‘Two India’ (दोन भारत) या शीर्षकाखाली एकपात्री प्रयोग सादर केला. त्यात त्याने म्हटले, “I come from an India where we worship woman during day and gang rape them at night ” (मी अशा भारतातून येतो जिथे आम्ही दिवसा स्त्रीची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो).

त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही लोकांनी त्याच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले आहे, परंतु अनेकांनी त्याच्यावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

भारताविरुद्ध अपशब्द वापरल्या प्रकरणी, वीर दासच्या विरोधात मुंबई पोलिसकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅडव्होकेट आशुतोष दुबे, भाजप-महाराष्ट्राचे कायदा सल्लागार यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, वीर दासने या वादावर ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यानी लिहिले, “मी यूट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आली आहे. हा व्हिडिओ वेगळ्या गोष्टी करणाऱ्या दोन अत्यंत वेगळ्या भारताच्या द्वैताबद्दल व्यंग आहे.”

इतर बातम्या-

Bihar Crime | पत्नीची हत्या करुन पती मेहुणीसह फरार, मृतदेह बंद पेटीत आढळला, बिहारमधील घटना

चाइल्ड पोर्नोग्राफी : देशातील 14 राज्यांत सीबीआयचे छापे; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

मुलीने प्रेमविवाह केला म्हणून संतापलेल्या बापाचे क्रूर कृत्य, आधी बलात्कार मग हत्या

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.