VIDEO: रामानुजाचार्य विनम्र तितकेच विद्रोही, जातीप्रथांवर हल्ला करून सनातन धर्माच्या माध्यमातून देशाला जोडलं: अमित शहा

देशात जेव्हा जातीप्रथा आणि कुप्रथा होत्या, त्याकाळात रामानुजाचार्य यांनी समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. तब्बल 120 वर्ष ते जगले. या काळात त्यांनी समता प्रस्थापित करण्यासाठी मोठं काम केलं आहे.

VIDEO: रामानुजाचार्य विनम्र तितकेच विद्रोही, जातीप्रथांवर हल्ला करून सनातन धर्माच्या माध्यमातून देशाला जोडलं: अमित शहा
अमित शाह
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 8:09 PM

हैदराबाद: देशात जेव्हा जातीप्रथा आणि कुप्रथा होत्या, त्याकाळात रामानुजाचार्य (Shri Ramanujacharya) यांनी समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. तब्बल 120 वर्ष ते जगले. या काळात त्यांनी समता प्रस्थापित करण्यासाठी मोठं काम केलं आहे. रामानुजाचार्य जसे विन्रम स्वभावाचे होते. तसेच ते विद्रोहीही होते. ज्या समाजाला पूजेचा अधिकार नव्हता त्यांना पूजेचा अधिकार त्यांनी दिला. ज्यांना मंदिरात प्रवेश नाकारला जात होता, त्यांना मंदिरात प्रवेश देण्याचं काम त्यांनी केलं. प्रत्येक मानव समान आहे. कोणीही उच्चनीच नाही, असं सागणाऱ्या रामानुजाचार्यांच्या कार्याचा खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा गौरव केला होता, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Union home minister Amit Shah) यांनी सांगितलं. हैदराबादमधील हा अतिभव्य परिसरातील रामानुजाचार्यांचा भव्य पुतळा  (Statue of Equality) पाहून मन प्रसन्न होतं. मनाला अद्भूत शांती मिळते. तुम्ही सर्वांनी मिळून फार मोठं काम केलं आहे. युगानुयुगे तुमच्या या कार्याची दखल घेतली जाईल, असं अमित शहा म्हणाले.

महान संत रामानुजाचार्य यांचं हे सहस्त्राब्दी वर्ष आहे. या निमित्ताने हैदराबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामानुजाचार्यांचा जगातील दुसरा सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सहस्त्राबदी निमित्ताने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला आज अमित शहा उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी आल्यावर त्यांनी सर्व मंदिर परिसराची पाहणी केली. त्यानंतर रामानुजाचार्य यांच्या भव्य पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. तसेच पुतळ्याचं बारकाईने निरीक्षणही केलं. त्यानंतर झालेल्या छोटेखानी समारंभात शहा यांनी रामानुजाचार्यांच्या कार्यावर प्रकाश टाकतानाच त्यांनी दिलेला समतेचा विचार आजच्या काळात किती महत्त्वाचा आहे हे स्पष्ट केलं.

आदि शंकरासारखच कार्य

रामायण आणि महाभारतापासून ते आजपर्यंत सनातन धर्मात अनेक चढउतार आले. पण तरीही सनातन धर्म टिकून राहिला. जेव्हाही सनातन धर्मावर संकट आलं तेव्हा त्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली. शंकराचार्यानंतर रामानुजाचार्यांनी मोठं काम केलं. आदि शंकराचार्याने सर्व धर्मांची मतमतांतरे एकत्र करून देशाला एकत्र केलं. सर्व मतप्रवाह एका छत्रछायेखाली आणले. रामनाजुचार्यांनी त्यांच्या जीवन कवनाने सर्व देशाला सनातन धर्माशी जोडण्याचं काम केलं. कुप्रथा, रुढी आणि परंपरा त्यांनी आपल्या कार्याने बदलल्या, असं शहा म्हणाले.

मीच सत्य हा अहंकार सनातन धर्मात नाही

सनातन धर्मात असं काय आहे की त्याची धारा निरंतर वाहत असते? त्यातील अमृततत्त्व काय आहे? सर्व धर्माचा अभ्यास केला अन् सनातन धर्माचा अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे मीच सत्य आहे, हा अहंकार सनातन धर्मात नाही. आपल्या शास्त्रामध्ये खंडनमंडनाची व्यवस्था आहेच. पण चांगलं ते स्वीकारण्याचीही वृत्ती आहे. त्यामुळेच सनातन धर्म पुढे गेला. आज आपण खूप मागे आहोत असं वाटत असेल. पण समोर सर्व धर्माच्या गुरुंना पाहिल्यावर ही यात्रा कधी ना थांबेल, ना कधी थकेल असा विश्वास आहे. ही यात्रा दिग्विजयी होऊन संपूर्ण जगात ज्ञानाचा प्रसार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येकाला मोक्षाचा अधिकार

सर्वांना ज्ञान घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला पूजेचा अधिकार आहे, असं सांगत त्यांनी जातीप्रथा मोडीत काढण्यासाठी काम केलं. प्रत्येक समाजाला पूजेचा समान अधिकार देऊन त्यांनी प्रत्येक समाजाला जोडण्याचं काम केलं. भाषेचा अधिकार दिला. प्रत्येक जीवाला मोक्षाचा अधिकार असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं. रामनाजुचार्य विनम्र आणि विद्रोही होते. त्यांच्यातील विद्रोही चेतनेनेच कुप्रथा नष्ट केल्या, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

आदि शंकराचार्यांएवढंच रामानुजाचार्यांचं कार्य अद्भभूत; ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ पाहिल्यावर मनाला शांती मिळते : अमित शहा

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमधील हिमवादळात 7 जवान शहीद; दोन दिवसांपासून सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन

उत्तर प्रदेश निवडणुकीत वंचितचा समाजवादी पार्टीला पाठिंबा, बसपा आणि भीम आर्मीबद्दल आंबेडकर नेमके काय म्हणाले?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.