Statue Of Equality : रामानुजाचार्य यांची विशाल मूर्ती ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’च्या रुपात आपल्याला समानतेचा संदेश देतेय- मोदी
रामानुजाचार्य यांचं ज्ञान जगासाठी मार्गदर्शक ठरावं, अशी अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. रामानुजाचार्य यांच्या विशाल मूर्तीच्या रुपाने भारत मानव ऊर्जा आणि प्रेरणांना मूर्त रुप देत आहे. रामानुजाचार्य यांची ही प्रतिमा त्यांचं ज्ञान, वैराग्य आणि आदर्शांचं प्रतिक आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी (Statue Of Equality) अर्थात जगद्गुरू रामानुजाचार्य (Shri Ramanujacharya) यांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं. यावेळी मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना देशवासियांना वसंत पंचमीच्या (Vasant Panchami) शुभेच्छा दिल्या. या शुभ दिनी रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचं लोकार्पण होत आहे. रामानुजाचार्य यांचं ज्ञान जगासाठी मार्गदर्शक ठरावं, अशी अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. रामानुजाचार्य यांच्या विशाल मूर्तीच्या रुपाने भारत मानव ऊर्जा आणि प्रेरणांना मूर्त रुप देत आहे. रामानुजाचार्य यांची ही प्रतिमा त्यांचं ज्ञान, वैराग्य आणि आदर्शांचं प्रतिक आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
‘सबका साथ, सबका विश्वास और सबका प्रयास’
आज रामानुजाचार्य यांची विशाल मूर्ती स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या रुपात आपल्याला समानतेचा संदेश देत आहे. हाच संदेश घेऊन आज देश ‘सबका साथ, सबका विश्वास और सबका प्रयास’ हा मंत्र घेऊन आपल्या नव्या भविष्याचा पाया रचत आहे. आजपासून 1 हजार वर्षापूर्वी रुढी-पंरपरा आणि अंधविश्वासाचा पगडा किती मोठा असेल. मात्र त्यावेळी रामानुजाचार्य यांनी समाजातील सुधारणांसाठी समाजाला भारताच्या खऱ्या विचारांची ओळख करुन दिली, असं मतही मोदींनी यावेळी व्यक्त केलं.
PM Shri @narendramodi inaugurates ‘Statue of Equality’ commemorating Bhakti Saint Sri Ramanujacharya in Hyderabad. https://t.co/3o77rMGMEs
— BJP (@BJP4India) February 5, 2022
‘रामानुजाचार्य यांची मूर्ती येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल’
मला विश्वास आहे की रामानुजाचार्य यांची ही प्रतिमा केवळ येणाऱ्या पिढीसाठीच प्रेरणादायी ठरणार नाही तर भारताची प्राचीन ओळखही अधिक मजबूत करणारी आहे. विकासासाठी आपल्या मूळांपासून दूर जाणं गरजेचं नाही. तर आपण आपल्या मुळांना घट्ट पकडून राहू आणि आपल्या वास्तविक शक्तीला ओळखण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं. भारत एक असा देश आहे, ज्या देशातील ऋषीमुनींनी ज्ञानाला खंडन-मंडन, स्वीकृती-अस्वीकृतीच्या पुढे जाऊन पाहिलं आहे. आमच्या येथे अद्वैतही आहे आणि द्वैतही आहे. या द्वैत-अद्वैतांचा समावेश करून, श्री रामानुजाचार्य यांचे विशिष्ट-द्वैत देखील आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
तेलंगाना: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने शमशाबाद में 11 वीं शताब्दी के भक्ति संत श्री रामानुजाचार्य की स्मृति में 216 फीट ऊंची प्रतिमा ‘स्टैच्यू ऑफ इक्वलिटी’ का अनावरण किया। pic.twitter.com/IcSk7A71OL
— ANI_HindiNews (@AHindinews) February 5, 2022
रामानुजाचार्यांनी कर्मावर भर दिला
जे विचार परस्पर विरोधी भाषी असतात त्यांना रामानुजाचार्य एका सूत्रात आणतात. त्यांच्या ज्ञानामुळे सामान्य माणूसही त्यांच्याशी जोडला जातो. त्यांच्या भाष्यात ज्ञानाची पराकाष्ठा आहे. दुसरीकडे ते भक्तीमार्गाचे जनक आहेत. तर दुसरीकडे समृद्ध संन्यास परंपरेचे संतही आहेत. गीतेवरील भाष्यात त्यांनी कर्माचं महत्त्व अत्यंत उत्तमरित्या अधोरेखित केलं आहे. त्यांनी स्वत:चं आयुष्य कर्मासाठी अर्पण केलं होतं. त्यांनी संस्कृत ग्रंथ लिहिले आणि तामिळ भाषेलाही भक्तीमार्गात तेवढंच महत्त्व दिलं, असं ते म्हणाले.
इतर बातम्या :