वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करणारा अटकेत, दगडफेकीचे कारण ऐकून बसेल धक्का

Vande Bharat Express : देशात अल्पवधीतच लोकप्रिय झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकीचे प्रकार वाढत होते. रेल्वे सुरक्षा बलाने दगडफेक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. त्याने असे काही कारण सांगितले की पोलिसांनी डोक्याला हात लावला.

वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करणारा अटकेत, दगडफेकीचे कारण ऐकून बसेल धक्का
vandebharat Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 4:07 PM

बंगळुरु : भारतीय रेल्वेचा विस्तार होत आता सेमी हायस्पीड समजली जाणारी वंदे भारत ट्रेन सुरु झाली आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस सध्या १४ मार्गावरुन जात आहे. महाराष्ट्रातून मुंबई-पुणे-सोलापूर (Mumbai-Pune-Solapur Route) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. तसेच मुंबई गांधीनगर आणि मुंबई शिर्डी अशीही ट्रेन सुरु आहे. दरम्यान बेंगळुरू रेल्वे विभागात मालूर आणि टायकल दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसवर नेहमी दगडफेक होत होती. त्यासंदर्भात एका व्यक्तीस रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात पकडले. त्यांने दगडफेक करण्याचे जे कारण दिले ते ऐकून सुरक्षा दलाच्या जवानांनी डोक्याला हात लावला.

कोण आहे तो व्यक्ती

रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करणाऱ्या एका 36 वर्षीय व्यक्तीला अटक केली. त्याचे नाव अभिजीत अग्रवाल आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीत त्याने सांगितले की, मला वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यासाठी देवाकडून आदेश येत होता. त्यानंतर मी दगडफेकत होतो. वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकल्यामुळे मला जेवण मिळत होते.

हे सुद्धा वाचा

गुन्हा दाखल

वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्याप्रकरणी आरपीएफने अभिजीत अग्रवाल नावाच्या व्यक्तीला अटक केली. त्याच्याविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १५३ व १४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मनोरुग्ण असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले.

पोलिसांनी असे घेतले त्याला ताब्यात

वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक होत असल्यामुळे आरपीएफने गस्त वाढवली होती. इन्स्पेक्टर एसके थापा यांच्यासह त्यांचे पथक साध्या वेशात रेल्वे रुळांवर गस्त घालत होतो. त्यावेळी त्यांनी अभिजित अग्रवाल याला रुळांवरून दगडे उचलताना पाहिले. तो वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकण्याची तयारी करत होता. दगडफेक करण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पकडले. त्याने म्हैसूर-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेसवर आपण नेहमी दगडफेक करत असल्याची कबुली दिली आहे.

रेल्वे ट्रॅक किंवा स्टेशनवर झोपतो

अभिजित अग्रवाल हा रेल्वे ट्रॅक किंवा स्टेशनवर राहतो. तो तेथेच राहतो खातो आणि झोपतो. त्याने ठामपणे सांगितले की, देवाने त्याला गाड्यांवर दगड फेकण्याचा आदेश दिला होता त्यामुळे मी दगडफेक करत होतो. त्यानंतर मला भोजनही मिळत होते.

मेक इन इंडिया ट्रेन

देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली वंदेभारत वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.