नेपाळहून येणाऱ्या शिळा पाहण्यासाठी गर्दी, मार्गात जोरदार स्वागत, पूजा
शिळा अयोध्येत पोहोचल्यानंतर ट्रस्ट आपले काम करेल. या शिळा 2 फेब्रुवारीला अयोध्येत पोहचणार आहे. त्या शिळा तब्बल 6 कोटी वर्षे जुन्या आहेत.
अयोध्या : माता सीतेचे गाव असलेले जणकपूर म्हणजे नेपाळहून दोन शिळा अयोध्येत येत आहे. 350-400 टन वजनाच्या या शिळा पाहण्यासाठी रस्त्यात गर्दी होत आहे. त्यांची पूजा केली जात आहे. या शिळा सुमारे 6 कोटी वर्षे जुन्या आहेत. या शिळांचे वैशिष्ट म्हणजे यापासून श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाणार आहेत.
The stone of Dev Shila Shaligram, which is going from Pokhara, Nepal to #Ayodhya is being worshiped by the devotees on the way.
हे सुद्धा वाचाJai Shri Ram ? pic.twitter.com/LfZ7YjroaN
— Megh Updates ?™ (@MeghUpdates) January 28, 2023
नेपाळी लोकांच्या भावनांचा आदर करत श्री रामजन्मभूमी ट्रस्टने जानकी मंदिराला पत्र लिहून कालीगंडकी नदीतील (शालीग्राम नदी) शिळा काढण्याची विनंती केली होती. TV9 ला मिळालेल्या पत्रात, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी जानकी माता मंदिराला दोन पत्रे लिहिली असून, कालीगंडक म्हणजेच शालिग्रामी नदीतील शिळा आणि श्री रामाचे धनुष्य देण्याची विनंती केली होती.
आता या दोन्ही शिळा नेपाळमधील पोखरा येथून भूगर्भीय आणि पुरातत्व तज्ज्ञांच्या देखरेखीखाली काढण्यात आल्या. 26 जानेवारी रोजी ट्रकमध्ये भरल्या. त्यांचे पूजन केल्यानंतर दोन्ही शिळा ट्रकने अयोध्येला पाठवण्यात येत आहेत. त्यातील एका शिळाचे वजन 26 टन आहे तर दुसऱ्या शिळाचे वजन 14 टन आहे. म्हणजेच दोन्ही शिळांचे वजन 40 टन आहे.
शिळा 6 कोटी वर्षे जुन्या
राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी सांगितले की, शिळा अयोध्येत पोहोचल्यानंतर ट्रस्ट आपले काम करेल. या शिळा 2 फेब्रुवारीला अयोध्येत पोहचणार आहे. त्या शिळा तब्बल 6 कोटी वर्षे जुन्या आहेत.
काय आहे इतिहास
नेपाळची शालिग्रामी नदी भारतात प्रवेश करताच नारायणी बनते. तिला बुढी गंडकी नदी म्हणतात. या नदीच्या काळ्या शिळांची भगवान शालिग्राम यांनी पूजा केली जाते. शालिग्रामी नदीतच शालिग्राम शिळा सापडते. ही नदी दामोदर कुंडातून उगम पावते आणि बिहारमधील सोनेपूर येथे गंगा नदीला मिळते.
शिळा काढण्यापूर्वी माफी
नदीच्या पात्रातून शिळा काढण्यापूर्वी धार्मिक विधी झाला. नदीची माफी मागण्यात आली. विशेष पूजा केली गेली. नेपाळमधील गाळेश्वर महादेव मंदिरात 26 जानेवारीला शिळांचा रुद्राभिषेकही केला.़
नेपाळचे माजी उपपंप्रधान शिळांसोबत
शिळांसोबत सुमारे 100 लोक भारतात येत आहेत. रस्त्यात्या अनेक ठिकाणी त्यांच्या विश्रांतीची व्यवस्था केली आहे. शिळांसोबत नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमलेंद्र निधी, जनकपूरचे महंत येत आहेत. ते अयोध्येपर्यंत येतील. राममंदिर ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल हेही यात्रेसोबत आहेत.
रामजन्मभूमीचे जुने मंदिर
शालिग्रामी शिळा खूप मजबूत आहेत. त्यामुळे कारागीर बारीकसारीक गोष्टी कोरतात. अयोध्येतील रामाची धूसर मूर्ती अशा प्रकारच्या शिळेवर कोरलेली आहे. रामजन्मभूमीच्या जुन्या मंदिरातील कसौटीचे अनेक खांब यापासून बनवलेले आहेत.