Republic Day | ‘म्हारी छोरियां किसी से कम हैं के’, प्रियंका पंवार कशी बनली ATS ची स्पेशल ऑपरेशन्स कमांडो?
Republic Day | "एकदिवस SPOT च्या इंस्पेक्टरने मला सांगितलं की, एक मुलगी परीक्षा देण्यासाठी आली आहे, काय करायच? मी सांगितलं, बोलवा त्या मुलीला. त्यावेळी पहिल्यांदा माझी प्रियंका बरोबर भेट झाली"
Republic Day | देशातील सर्वात मोठ राज्य उत्तर प्रदेशात दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी योगी सरकारने स्पेशल पोलीस ऑपरेशन्स टीम (SPOT) कमांडो युनिट बनवलय. या कमांडो युनिटच वैशिष्ट्य म्हणजे त्यात महिलांना सुद्धा स्थान दिलय. यूपी सरकारमधील मंत्री असीम अरुण यांनी महिला कमांडो प्रियंका पंवारच कौतुक केलं व तिचा या युनिटमध्ये कसा समावेश झाला? तो किस्साच सांगितला.
योगी सरकारमध्ये समाज कल्याण मंत्री असीम अरुण यांनी सांगितलं की, “प्रियंका यूपी सरकारमधील स्पेशल पोलीस ऑपरेशन्स टीमची महिला कमांडो आहे. प्रियंकाच्या कमांडो बनण्याची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे” मंत्री असीम अरुण यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रियंका पंवारच कौतुक केलय.
‘एक मुलगी परीक्षा देण्यासाठी आली आहे, काय करायच?’
“जेव्हा योगींनी मला एटीएस SPOT ची स्थापना करण्याचे आदेश दिले. त्यावेळी राज्यातील पोलीस दल आणि PAC मधून इच्छुकांची नाव मागवली. अनेक पोलीस कर्मचारी येऊन परिक्षा द्यायचे. कठीण टेस्ट होती. काही उत्तीर्ण व्हायचे” असं असीम अरुण म्हणाले. “एकदिवस SPOT च्या इंस्पेक्टरने मला सांगितलं की, एक मुलगी परीक्षा देण्यासाठी आली आहे, काय करायच? मी सांगितलं, बोलवा त्या मुलीला. त्यावेळी पहिल्यांदा माझी प्रियंका बरोबर भेट झाली. तिने मला सांगितलं, सर मी सुद्धा कमांडो बनू शकते. मी कुस्ती खेळाडू आहे” असं असीम अरुण यांनी लिहिलं आहे.
‘आम्ही चूक सुधारली’
“मुलीमध्ये जोश होता, स्पोर्ट्समुळे फिटनेस होता. मला वाटलं, माझ्याकडून मोठी चूक झालीय. कारण, आम्ही जे अर्ज मागवले, त्यात महिलांचा उल्लेखच केला नव्हता. आम्ही चूक सुधारली. प्रियंकाची टेस्ट घेतली” असं असीम अरुण यांनी म्हटलं आहे.
खतरकनाक मोहिमा त्यांनी पार पडल्या
प्रियंकाची निवड झाली. पुढे SPOT मध्ये तिच प्रशिक्षण झालं. प्रियंका ट्रेनिंगमध्ये टॉपवर होती. तिने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं. तिच्यापासून प्रेरणा घेऊन अन्य मुली SPOT टीमचा भाग बनल्या. खतरकनाक मोहिमा त्यांनी पार पडल्या. मंत्र्याने पोस्टच्या अखेरीस लिहिलय की, ‘धोका पत्करायचा विषय असो किंवा कार्यक्षमतेचा म्हारी छोरियां किसी से कम हैं के.’