‘या’ 5 ठिकाणी हल्ला केला तर अख्खा पाकिस्तान बेचिराख; कोणती आहेत ही ठिकाणे?
जम्मू-काश्मीरमधील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर भारत-पाक संबंध तणावात आहेत. पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रांच्या वाढत्या साठ्यामुळे चिंता वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानच्या आण्विक तळांवर थेट हल्ला करणे हा एक पर्याय असू शकतो. त्यामुळे पाकिस्तान बेचिराख होण्यास वेळ लागणार नाही.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारत आपल्यावर हल्ला करेल अशी पाकिस्तानला सातत्याने भीती वाटत आहे. वातावरण इतकं बिघडलंय की पुढे काय? असा सवाल केला जात आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. तर पाकिस्तानकडून अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली जात आहे. त्यावर भारतानेही पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत.
या तणावाच्या परिस्थितीत भारताला जर पाकिस्तानला धडाच शिकवायचा असेल तर केवळ हल्ला सीमावर्ती भागापर्यंतच सीमित ठेवावा लागणार का? थेट पाकिस्तानच्या मुळावरच घाव घालू नये का? ज्या गोष्टीवरून पाकिस्तान जगाला धमकावत आहे, त्याच गोष्टींवर घाव का घालू नये? म्हणजे पाकिस्तानच्या अण्वस्त्र स्थळांवर हल्ला का करू नये? तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानची अण्वस्त्र ताकद कमी करायची असेल तर इकडे तिकडे हल्ला करण्यापेक्षा थेट पाकिस्तानच्या अण्वस्त्र तळांवरच हल्ला केला पाहिजे. सॅटेलाईट फोटो आणि रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानच्या काही ठरावीक ठिकाणांवर हल्ला केल्यास पाकिस्तानची अण्वस्त्र ताकदच नष्ट होईल. वाचा: ‘याचा अर्थ तुम्ही नालायक…’, पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य करताना शाहिद आफ्रीदीने ओलांडल्या मर्यादा
अण्वस्त्र साठ्याची जमवाजमव
‘बुलेटिन ऑफ द एटॉमिक साइंटिस्ट्स’च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान वेगाने अण्वस्त्राचा साठा वाढवत आहे. देशात हत्यारे बनवणे आणि लॉन्च करण्याची तयारी जमीन, हवा आणि समुद्र या तिन्ही स्तरावर होत आहे. याचा अर्थ भारताच्या कोणत्याही भागावर हल्ला करण्याची क्षमता. रिपोर्टनुसार, पाकिस्तानची ‘फुल स्पेक्ट्रम डिटरेंस’ रणनीतीत रणनीतिक, ऑपरेशनल आणि टॅक्टिकल तिन्ही प्रकारचे अण्वस्त्र आहेत. मिसाईलची तयारी होत आहे. हे मिसाईल कुठूनही चालवले जाऊ शकतात. विशेष म्हणजे पाकिस्तानचे हे बेस भारतीय सीमेच्या अत्यंत जवळ आहे. उदाहरणार्थ गुजरांवाला गारिजन आणि पानो अकील गारिजन ही स्थळं भारताच्या सीमेपासून अवघ्या 60-85 किलोमीटर अंतरावर आहे.
या ठिकाणांवर हल्ला केल्यास, पाकिस्तान थेट बेचिराख
1. गुजरांवाला गारिजन :
पाकिस्तानचा हा गारिजन भारतीय सीमेपासून केवळ 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे नसर (Hatf-9) सारखे टॅक्टिकल अण्वस्त्र मिसाइल सिस्टिम तैनात आहे. वेगाने ते लॉन्च केले जाऊ शकतात. याची रेंज एवढी आहे की, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली थेट टार्गेटवर येऊ शकते.
2. पानो अकील गारिजन :
सिंध प्रांताच्या या बेसवरून भारताच्या पश्चिमी सीमेला टार्गेट केलं जाऊ शकतं. या ठिकाणी बाबर आणि शाहीन मिसाइलचे लॉन्चर नेहमीच सॅटेलाइट फोटोत दिसतात. या गारिजनमध्ये सुमारे 50 TELs (लॉन्चिंग ट्रक) साठी जागा आहे.
3. अकरो गारिजन :
या ठिकाणी मिसाइल लॉन्चरसाठी सहा विशेष बंकर नुमा गॅरेज आहेत. जमिनीच्या खाली बनलेले दोन क्रॉस शेप अंडरग्राउंड स्ट्रक्चर आहेत. यावरून या ठिकाणावरून गंभीरपणे अण्वस्त्र ऑपरेशन केलं जाऊ शकतं, हे स्पष्ट होतं. Babur cruise missile चे TELs या गारिजनमध्ये दिसले आहेत.
4. सर्गोधा गारिजन :
हा भाग 1980च्या दशकापासूनच पाकिस्तानच्या अण्वस्त्र धोरणाचा भाग राहिला आहे. या ठिकाणी 10हून अधिक अंडरग्राऊंड बंकर आणि हँडलिंग फॅसिलिटी आहेत. याच्या जवळच Sargodha Weapons Storage Complex सुद्धा आहे, या ठिकाणी अणू बॉम्ब स्टोअर केले जातात.
5. खुजदार गारिजन :
या ठिकाणी नुकतंच तीन नवीन TEL गॅरेज आणि भूमिगत शस्त्र स्टोरेज यूनिट्स बनवण्यात आले आहेत. हा परिसर पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिमला आहे. परंतु, त्यांची रणनीतीक पोझिशन भारतासाठी चिंतेचा विषय आहे.
रिपोर्टनुसार, भारताने जर पाकिस्तानच्या या पाच प्रमुख अण्वस्त्र ठिकाणांना टारगेट केलं तर पाकिस्तानची अण्वस्त्र क्षमता पूर्णपणे ठप्प होईल. तसेच पाकिस्तान हा बेचिराख होऊन जाऊ शकतो.