सत्तरी पार झाली तरी हट्टीपणा जात नाही, अजित पवारांचं नाव न घेता टोला

अजित पवारांनी नेतृत्वावरुन शरद पवारांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे. वडिलांची सत्तरी पार झाली तरी हट्टीपणा जात नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवारांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात पाहुयात.

सत्तरी पार झाली तरी हट्टीपणा जात नाही, अजित पवारांचं नाव न घेता टोला
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 8:59 PM

‘वडील सत्तरी पार झालेत तरी हट्टीपणा सोडत नाहीत. जबाबदारी सोपवणार की नाही.’ म्हणत पुन्हा एकदा अजित पवारांच्या मनातलं समोर आलंय. पुण्याच्या मावळमध्ये विकास कामांचा लोकार्पण सोहळा अजित पवारांच्या हस्ते झाला. मात्र नाव न घेता अजित पवारांचा टोला शरद पवारांनाच होता. जबाबदारी देऊन तुम्ही मार्गदर्शन करा, असं याआधीही अजित पवार अनेकदा बोलले आहेत. आता पुन्हा सासू सूनेचं उदाहरण देवून अजित पवारांनी शरद पवारांना डिवचलं आहे. तर पुण्यात शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. पुढचे 3 दिवस शरद पवार पुण्यातच तळ ठोकून असतील.

इच्छुकांच्या मुलाखती पवारांनी मराठवाड्यापासून सुरु केल्या आहेत. मराठवाड्यातील इच्छुकांना त्यांनी पुण्यात बोलावून घेतलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांकडे आलेले बाबाजानी दुर्राणी यांनीही शरद पवारांकडे मुलाखत दिली आहे. दुर्राणी पाथरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत.

मराठवाड्यात एकूण 46 आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत 6 आमदार गेले तर शरद पवारांकडे दोनच आमदार राहिलेत. त्यामुळं मुलाखती घेताना शरद पवारांनी मोर्चा मराठवाड्याकडेच वळवला आहे. लोकसभेत फक्त बारामती आणि शिरुर अशा 2 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत झाली. ज्यात दोन्ही ठिकाणी शरद पवारांच्याच राष्ट्रवादीनं बाजी मारली.

आता, विधानसभेत मात्र बऱ्यात ठिकाणी आमना-सामना होणार आहे. 2 दिवसांआधीच शरद पवारांनी पुण्यातल्या खराडीतून, दादा गटातील सुनिल टिंगेंना दिवट्या आमदार म्हटलं होतं. आता अजित पवारांनी धडाकेबाज आमदार म्हणत टिंगरेंचं कौतुक केलंय. प्रत्यक्ष प्रचाराला अजून सुरुवात झालेली नाही. प्रचार सुरु झाल्यावर अशी शाब्दिक चकमक आणखी तीव्र होईल.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक ठिकाणी नेते मतदारसंघावर आतापासूनच दावा ठोकत आहेत. अनेक मतदारसंघात उमेदवार निश्चित करण्याचं काम महायुती आणि महाविकासआघाडी दोघांकडून सुरु आहे. निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे मागे राहू नये म्हणून प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. एकीकडे महायुतीचा केलेल्या कामांचा जोरदार प्रचार सुरु आहे तर महाविकासआघाडीचे नेते ही प्रचाराला लागले आहेत. बैठकांवर बैठका सुरु आहेत.

शरद पवारांनी इच्छूकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. त्यातच अनेक नेते तिकीट मिळणार की नाही याचे संकेत मिळतात पुढची वाट धरत आहेत. असं असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाना साधलाय.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.