कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका विद्यार्थिनीच्या हत्येची घटना समोर आली आहे. ही मुलगी एमएससीची विद्यार्थिनी होती. एकतर्फी प्रेमसंबंधातून तिच्यासोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने प्रेयसी असलेल्या विद्यार्थीनीची हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, हत्या झालेल्या विद्यार्थिनीवर सोमनाथ नावाचा विद्यार्थी एकतर्फी प्रेम करायचा. त्याचे वडिलदेखील पोलीस खात्यात काम करायचे. आरोपींनी विद्यार्थीनीला ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या टाकून तो ज्यूस प्यायला दिला होता. ज्यूस प्यायल्यानंतर विद्यार्थीनीला धुंदी आली. तिला नशा चढल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी विद्यार्थ्यांनी गळा दाबून मुलीची हत्या केली.
मुलीच्या हत्येची घटना 29 डिसेंबरला घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर तिसरा आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी आज दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्याने मुलीला तिच्यावर आपले प्रेम असल्याचे सांगितले. त्याने प्रपोज केले, मात्र मुलीने त्याच्या प्रेमाचा स्विकार करण्यास स्पष्ट नकार कळवला. त्याचा राग आरोपी तरुणाच्या मनात खदखदत होता. त्याच नाराजीतून एकतर्फी प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्याने हत्येचा कट रचला. त्यानुसार मुलीला 29 डिसेंबरला बोलावून घेण्यात आले व नशेच्या गोळ्या टाकलेला ज्यूस प्यायला देण्यात आला. ती नशेत गेल्याचे दिसून आल्यानंतर गळा आवळून तिचा खून करण्यात आला.
आरोपींनी नशेच्या गोळ्या खाल्लेली मुलगी पुन्हा शुद्धीवर येऊन प्रतिकार करेल, या शक्यतेने तिचे हातपाय तारेने बांधले होते. तिची हत्या केल्यानंतर मृतदेह जवळपास चार तास कारमध्ये फिरवला. यादरम्यान काही ठिकाणी पोलिसही दिसले होते. रात्रीच्या वेळी त्यांनी मुलीचा मृतदेह पुलाखाली फेकून दिला आणि ते फरार झाले. यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. (Student murdered in Uttar Pradesh out of one-sided love by the lover with the help of two friends)
इतर बातम्या
UP Crime : प्रियकराशी भांडण करून प्रेयसी ट्रकमधून खाली उतरली अन् जीवाला मुकली, वाचा नेमके काय घडले?
Pimpri chinchawd crime | पिंपरीत पाण्याच्या टँकर खाली चिरडल्याने दोन वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू