IPS Success Story : दरवर्षी हजारो तरुण यूपीएससी परीक्षा देतात. पण त्यापैकी मोजक्याच जणांना यश मिळतं. या परीक्षेच्या तयारीसाठी अनेक जण कोचिंग क्लासेसची मदत घेतात. तर काही जण आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी होतात. आयपीएस अंशिका वर्मा देखील त्यापैकीच एक नाव. जिने कोणत्याही शिकवणी शिवाय ही परीक्षा उत्तीर्ण झाली.
अंशिका वर्मा ही प्रयागराजची राहणारी. गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेक केल्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. नागरी सेवेत रुजू होण्याचे तिचे सुरुवातीपासूनचे स्वप्न होते.
इंजिनीअरिंग केल्यानंतर तिने सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. यूपीएससीसाठी तिने कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही. 2020 मध्ये तिने पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. मात्र, यश मिळाले नाही. अपयशानंतरही तिने हिंमत हारली नाही आणि अभ्यास सुरूच ठेवला.
2021 मध्ये तिने पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. यावेळी तिला देशात 136 वा क्रमांक मिळाला आहे. तिला यूपीएससीमध्ये एकूण 972 गुण मिळाले. लेखी परीक्षेत 796 तर मुलाखतीत 176 गुण मिळाले होते.
UPSC उत्तीर्ण झाल्यानंतर अंशिका वर्माची IPS साठी निवड झाली. आयपीएसमध्ये निवडीसोबतच तिला होम केडरही मिळाले. अंशिका सोशल मीडियावर लोकप्रिय चेहरा आहे. तिचे २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.