Success Story : चहा पावडर विकून महिला कोट्यधीश, वार्षिक टर्नओव्हर बघाल तर थक्क व्हाल

छोट्या व्यवसायात सुद्धा कोटींची उलाढाल होऊ शकते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. हरियाणातील पायल मित्तल अग्रवाल यांनी ते करुन दाखवलं आहे. (Success story payal agarwal tea powder)

Success Story : चहा पावडर विकून महिला कोट्यधीश, वार्षिक टर्नओव्हर बघाल तर थक्क व्हाल
पायल अग्रवाल
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 5:41 PM

चंदिगढ : असं म्हणतात की स्वत:चा उद्योग सुरु करायचा असेल तर जास्त भांडवलाची गरज असते. भांडवल आणि मोठा नफा देणारा उद्योग असेल तरच आपण यामध्ये यश संपादन करुन शकतो, असा समाजामध्ये दंडक आहे. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती आणि काम करण्याची धमक असेल तर, छोट्यातली छोटी कल्पना सत्यात उतरवली तर त्यामधून कोटींची उलाढाल होऊ शकते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. हरियाणातील पायल मित्तल अग्रवाल (Payal Agarwal) यांनी ते करुन दाखवलं आहे. (Success story of Payal Agarwal who started to sell the tea powder)

हरियाणांतील पायल मित्तल अग्रवाल यांचा चहा पावडर (tea powder) तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्या चहा पावडर विकतात. सुरुवातीला त्या सिलिगुडी येथे राहायच्या मात्र, सध्या त्या गुरुग्राम येथे राहतात. त्यांच्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल तब्बल 2 कोटी रुपये आहे.

चहा पावडर विकण्याची कल्पना कशी सुचली?

त्यांनी चहा पावडर विकण्याचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी कोणतेही विषेश प्रशिक्षण घेतले नाही. त्यांनी फक्त आपल्या कल्पनाशक्तीचा अपयोग केला. आपल्या कल्पनेच्या जोरावरच त्यांनी हे यश मिळवले आहे. त्या एकदा युरोपमध्ये फिरायला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी येथे विक्रीसाठी असलेली दार्जिलिंगची जदप्रसिद्ध असलेली चहा पावडर पाहिली. याच ठिकाणी त्यांना एक भारतीय महिला भेटली. तिसुद्धा युरोपमध्ये भारतीय चहा पावडर विकत होती. त्यानंतर पायल यांनीसुद्धा चहा पावडर विकण्याचे ठरवले. त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला 7 लाख रुपयांची गुंतवणूक करुन त्यांनी सर्व यंत्रणा उभारली. त्यानंतर अपार मेहनत करुन त्यांनी आपल्या व्यवसायात जम बसवला. सध्या त्यांच्या या चहा पावडर विकण्याच्या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर 2 कोटी रुपये आहे.

शिक्षण पूर्ण करु शकल्या नाही, लग्नही लवकर

पायल यांना शिक्षणात रस नव्हता. त्या आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करु शकल्या नाहीत. त्यांच्या घरच्यांनी पायल यांना शिक्षण पूर्ण करण्याचे सांगितले मात्र, अभ्यासात त्यांचे मन लागले नाही. त्यांनतर त्यांचे लवकरच लग्न झाले. त्यांना मुलही लवकर झाले. असे असूनसुद्धा पायल यांनी स्वप्न उराशी बाळगून एक रेस्टॉरंट सुरु केले. मात्र, यामध्ये त्यांना फारसे यश आले नाही. त्यांनतर पायल यांनी चहा पावडर तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला.

चहा पावडरला विदेशात मागणी

दरम्यान, पायल अग्रवाल यांच्या कंपनीच्या उत्पादनांना विदेशातही प्रचंड मागणी आहे. त्या एकूण 100 पेक्षा जास्त प्रकारचे चहा पावडर उत्पादित करतात. त्या ग्रे टी, ग्रीन टी, कहवा, जॅस्मीन टी, अँटी स्ट्रेस टी, मसाला टी, डेटॉक्स टी अशा अनेक प्रकारच्या चाहांसाठी त्या चहा पावडर उत्पादित करतात. त्यांची ही यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

इतर बातम्या :

Success Story : सीएची नोकरी सोडून मधाच्या व्यवसाय, 6 महिन्यात उभारली 30 लाखाची कंपनी

(Success story of Payal Agarwal who started to sell the tea powder)

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.