सुधा मूर्तींनी संसदेतल्या पहिल्याच भाषणात संवेदनशील विषयाला घातला हात, नेमकं काय म्हणाल्या?
सुधा मूर्ती यांनी राज्यसभेत पहिल्यांदा राज्यसभेच्या खासदार म्हणून भाषण केलं. आपल्या पहिल्याच भाषणात सुधा मूर्ती यांनी सरकारकडे दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत. विशेष म्हणजे सुधा मूर्ती यांनी आपल्या संसदेच्या पहिल्याच भाषणात संवेदनशील विषयात हात घातला.
देशाच्या प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांनी नुकतंच राज्यसभेत आपलं पहिलं भाषण केलं. सुधा मूर्ती यांनी 14 मार्चला पती नारायण मूर्ती यांच्या उपस्थितीत संसद सदस्यत्वाची शपथ घेतली होती. यानंतर सुधा मूर्ती यांनी काल त्यांचं संसदेतील पहिलं भाषण केलं. सुधा मूर्ती या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्वावाच्या चर्चेवर बोलत होत्या. सुधा मूर्ती यांनी आपल्या पहिल्याच भाषणात केंद्र सरकारकडे दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत. त्यांच्या या मागण्यांची सध्या चर्चा सुरु आहे. सुधा मूर्ती यांनी आपल्या पहिल्या भाषणात दोन मुद्द्यांवर जोर दिला. एक म्हणजे महिलांमध्ये होणारा सर्वायकल कॅन्सर आणि दुसरा देशांतर्गत पर्यटन. सुधा आपल्या साडेबारा मिनिटांच्या भाषणात या दोन विषयांवरच बोलत राहिल्या.
“सर, मी कशी आणि कुठून सुरुवात करु? माला माहिती नाही. आदरणीय व्हाईस चेअरमन सर, हे माझं पहिलं भाषण आहे. सर, माझ्याजवळ किती वेळ आहे? पाच मिनिट. ओके सर. सर, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माझं नाव राज्यसभेसाठी नामांकीत केलं त्यासाठी मी खूप आभारी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या नावाची घोषणा ही महिला दिनाच्या दिवशी केली होती. मी नेहमी गरिबांसाठी ग्राउंड लेव्हलवर काम केलं आहे. त्यामुळे माझ्याकडे संसदेच्या दोन्ही सभागृहांचा अनुभव नाही”, असं सुधा मूर्ती सुरुवातीला म्हणतात. यानंतर सुधा आपल्या मुख्य मुद्द्यावर बोलायला सुरुवात करतात.
सुधा मूर्ती सर्वायकल कॅन्सवर काय म्हणाल्या?
“देशात सध्या सर्वायकल कॅन्सबाधित महिलांची संख्या प्रचंड वाढत आहे. आपली सामाजिक व्यवस्था अशी आहे की ज्यामध्ये महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्या रुग्णालयात पोहोचतात तेव्हा त्यांच्यातील सर्वायकल कॅन्स हा तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजवर पोहोचलेला असतो. त्यांना सांगणं कठीण होऊन जातं, असं सुधा मूर्ती म्हणाल्या. तसेच महिलाचं निधन झालं तर पतीला दुसरी पत्नी मिळून जाते. पण मुलांना दुसरी आई मिळत नाही”, अशी भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली.
“9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना सर्वायकरण कॅन्सर होऊ नये यासाठी लस दिली जाते. मुली ही लस घेतील तर त्यांना या आजाराची लागण होणार नाही. मुली या आजारापासून वाचू शकतात. त्यामुळे आपण या आजाराला थांबवण्यासाठी लसीकरण वाढवलं पाहिजे”, अशी मागणी सुधा मूर्ती यांनी केली. “विशेष म्हणजे या आजारावर प्रतिबंध करणाऱ्या लसीची किंमत आज बाजारात 1400 रुपये इतकी आहे. ही किंमत देखील कमी करण्यात यावी”, अशी मागणी सुधा मूर्ती यांनी केली.
🚨 Sudha Murty’s First Speech in Rajya Sabha
Excellent and Very Beautiful, Must Watch 👏 pic.twitter.com/Ji5WJkEf8c
— Ravisutanjani (@Ravisutanjani) July 2, 2024
सुधा मूर्ती यावेळी देशातील पर्यटनस्थळांविषयी देखील महत्त्वाची भूमिका मांडतात. देशातील काही प्रमुख अशी पर्यटनस्थळं आहेत ज्यांचा गवगवा होणं जरुरीचं आहे. तसेच देशात 57 चांगले पर्यटन स्थळ आहेत. या पर्यटनस्थळांचा विचार करता पर्यटन व्यवसाय कशाप्रकारे वाढेल, याचा विचार करणं जरुरीचं असल्याचं सुधा मूर्ती यांनी सांगितलं. यासाठी चांगले पर्यटन पॅकेज बनवण्यात यायला पाहिजेत,जेणेकरुन लोक येऊन ते पाहू शकतात. यासाठी लोकांसाठी चांगल्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. चांगले शौचालय, चांगले रस्ते असायला पाहिजेत जेणेकरुन पर्यटनाला चालना मिळेल, असंही सुधा मूर्ती म्हणाल्या.