वडिलांच्या छातीवर डोकं ठेवून सुखबीर ढसाढसा रडले, अख्ख्या पंजाबचे डोळे डबडबले, प्रकाश सिंह बादल अनंतात विलीन

| Updated on: Apr 27, 2023 | 8:33 PM

अत्यंयात्रेला आलेले शेकडो कार्यकर्ते रडत होते. प्रकाश सिंह बादल आपल्याला पुन्हा दिसणार नाहीत म्हणून त्यांनी दु:ख व्यक्त केलं. अतिशय शोकाकूल वातावरणात सुखबीर यांनी आपल्या पित्याला मुखाग्नी दिला. मुखाग्नी देण्याआधी सुखबीर यांनी पित्याच्या पार्थिवाला घट्ट मिठी मारली. ते इतके रडत होते की त्यांचा स्वत:वर ताबा राहिला नाही.

वडिलांच्या छातीवर डोकं ठेवून सुखबीर ढसाढसा रडले, अख्ख्या पंजाबचे डोळे डबडबले, प्रकाश सिंह बादल अनंतात विलीन
Follow us on

चंदिगढ : पंजाबवर मोठं संकट कोसळलंय. कारण पंजाबमधील बडे नेते, माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरलीय. राज्यात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. शहरातील, गावातील प्रत्येक गल्लीत, चौकावर बादल यांच्याविषयीच चर्चा होतेय. सर्वसामान्यांकडून बादल यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. तब्बल पाच वेळा मुख्यमंत्री पद भूषविणारा ताकदवान नेता पंजाबने गमवलाय. प्रकाश सिंह बादल यांच्या निधनामुळे बादल कुटुंबाची देखील वैयक्तिक हानी झालीय. या दु:खाला सामोरं जाणं बादल कुटुंबासाठी खूप कठीण झालंय. आपल्या वडिलांच्या निधनामुळे सुखबीर सिंह बादल हे प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. ते आज अक्षरश: आपल्या वडिलांच्या छातीवर डोकं ठेवून रडले. हे दृश्य टीव्हीच्या माध्यमातून अख्ख्या पंजाबने पाहिलं. ते पाहून अनेकांच्या डोळ्यांचा कडा पाणावल्या.

प्रकाश सिंह बादल यांच्यावर आज त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करण्याआधी सुखबीर पित्याच्या छातीवर डोकं ठेवून अतिशय आक्रोश करत ढसाढसा रडत होते. तो क्षण अतिशय भावनिक होता. आपले पिता आपल्याला सोडून गेले. आता ते कधीच आपल्याला दिसणार नाहीत या विचारांनी सुखीबर व्याकूळ झाले. त्यांनी प्रचंड आक्रोश केला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी त्यांचं सांत्वन केलं.

प्रकाश सिंह बादल यांच्या अंत्ययात्रेसाठी संपूर्ण पंजाबमधील लाखोंचा जनसागर लोटला होता. संपूर्ण बादल कुटुंब भावूक झालेलं होतं. यावेळी बादल यांचे नातेवाईकही आले होते. नातेवाईकांनी बादल कुटुंबियांचं सांत्वन केलं. अत्यंयात्रेला आलेले शेकडो कार्यकर्ते रडत होते. प्रकाश सिंह बादल आपल्याला पुन्हा दिसणार नाहीत म्हणून त्यांनी दु:ख व्यक्त केलं. अतिशय शोकाकूल वातावरणात सुखबीर यांनी आपल्या पित्याला मुखाग्नी दिला. मुखाग्नी देण्याआधी सुखबीर यांनी पित्याच्या पार्थिवाला घट्ट मिठी मारली. ते इतके रडत होते की त्यांचा स्वत:वर ताबा राहिला नाही. यावेळी इतरांनी त्यांचं सांत्वन केलं.

हे सुद्धा वाचा

प्रकाश सिंह बादल हे 95 वर्षांचे होते. त्यांच्यावर मोहालीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पंजाबमध्ये शोककळा पसरली आहे. प्रकाश सिंह बादल हे अकाली दलाचे वरिष्ठ नेते होते. तसेच ते तब्बल पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. प्रकाश सिंह बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 ला पंजाबमधील एका छोट्याशा गावात जाट शीख परिवारात झाला होता. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण पंजाब हळहळत आहेत.