ना सिद्धू, ना जाखड, अंबिका सोनी यांचाही नकार… आता मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सुखजिंदर रंधावा; सोनिया गांधींकडे खलबतं सुरू

पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच काही सुटताना दिसत नाही. नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील जाखड यांची नावे मागे पडल्यानंतर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रीदासाठी नकार दिला आहे. (Sukhjinder Randhawa likely to be Punjab Chief Minister)

ना सिद्धू, ना जाखड, अंबिका सोनी यांचाही नकार... आता मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सुखजिंदर रंधावा; सोनिया गांधींकडे खलबतं सुरू
Sukhjinder Randhawa
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 3:30 PM

चंदीगड: पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच काही सुटताना दिसत नाही. नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील जाखड यांची नावे मागे पडल्यानंतर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रीदासाठी नकार दिला आहे. त्यामुळे सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे याबाबत बैठक सुरू असून कोणत्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. (Sukhjinder Randhawa likely to be Punjab Chief Minister)

पंजाबमधील मुख्यमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे सोनिया गांधी यांच्याकडे हा प्रश्न गेला आहे. सोनिया गांधी आणि अंबिका सोनी यांची गेल्या पाऊण तासापासून मिटिंग सुरू असून अजूनही मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. मात्र, पंजाब काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव सोनिया गांधींकडे पाठवल्याचं सांगितलं जातं.

पदाची लालसा नाही

याबाबत मीडियाने रंधावा यांना सवाल केला. तेव्हा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला कोणत्याही पदाची लालसा नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाचं मला माहीत नाही. मी पक्षातील कार्यकर्ता आहे. त्यामुळे काय घडत आहे हे मी सांगू शकत नाही, असं रंधावा म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचं सस्पेन्स वाढलं आहे.

रंधावा कोण आहेत?

सुखजिंदर रंधावा हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. ते 62 वर्षाचे आहेत. पंजाबच्या डेरा बाबा नानक मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत. राज्य सरकारमध्ये सध्या ते कॅबिनेत मंत्री आहेत. त्यांच्याकडे सहकार आणि तुरुंग प्रशासन ही खाती आहेत.

गटबाजी रोखण्यासाठी निर्णय

सूत्रांच्या मते रंधावा यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झालं आहे. फक्त आज त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. रंधावा हे ज्येष्ठ नेते आहेत. सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही सिद्धू आणि अमरिंदर सिंग गटाच्या कुरघोडी सुरूच राहू शकतात. सिद्धू गटाने जाखड यांना विरोध केल्याने जाखड यांच्याकडे मुख्यमंत्रीद जाखड आणि सिद्धू गटातही तू तू मै मै होऊ शकते. त्यामुळेच रंधावा यांचं नाव फायनल केल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. रंधावा यांना मुख्यमंत्रीद दिल्यास गटातटाच्या राजकारणाला तिलांजली दिली जाऊ शकते. तसेच दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत त्याचा काँग्रेसला फटका बसणार नाही, म्हणूनच रंधावा यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल केल्याचंही सांगितलं जात आहे.

उद्या शपथविधी

दरम्यान, पंजाबमध्येही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. रंधावा मुख्यमंत्री झाल्यास सिद्धू आणि दलित चेहरा म्हणून डॉय राजकुमार वेरका यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. उद्या चंदीगडमध्ये छोटेखानी समारंभात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. (Sukhjinder Randhawa likely to be Punjab Chief Minister)

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री करायचा तर माझ्याच गटाचा करा, नाही तर बहुमत चाचणीला तयार राहा; अमरिंदर सिंग यांनी थेट हायकमांडला ललकारले

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबिका सोनीच!, सोनिया गांधींचं शिक्कामोर्तब; पण सोनी यांचा नकार

‘पंजाब में ट्विस्ट’, अंबिका सोनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत; जाखड यांना सिद्धू गटाचा विरोध

(Sukhjinder Randhawa likely to be Punjab Chief Minister)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.