राम नवमीला प्रभू रामललाच्या कपाळावर पडतील सूर्यकिरणे, 5 मिनिटाचा अविस्मरणीय क्षण
श्री रामलला मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रामनवमीच्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. या दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद असणार आहे. चार दिवस कोणतेही पास दिले जाणार आहेत. राम नवमीच्या दिवशी लाखो लोकं दर्शनाला येणार आहेत.

Ram Navami : श्री रामलला मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रामनवमीला रात्री ११ वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी ही माहिती दिली आहे. श्री रामनवमीला मंगला आरतीनंतर अभिषेक, शृंगार आणि दर्शन ब्रह्म मुहूर्तावर पहाटे साडेतीन वाजल्यापासून मंदिर सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहाटे ५:३० वाजता शृंगार आरती होईल, श्री रामललाचे दर्शन व सर्व पूजाविधी एकाच वेळी सुरू राहतील.
देवाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी वेळोवेळी अल्प कालावधीसाठी पडदा असेल. रात्री 11:00 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील, त्यानंतर प्रसंगानुसार भोग आणि शयन आरती केली जाईल.
रामनवमीच्या शयन आरतीनंतर मंदिरातून बाहेर पडताना प्रसादाची सोय केली जाणार आहे. असे तीर्थक्षेत्रातून सांगण्यात आलेय. भाविकांनी त्यांचे मोबाईल फोन, शूज, चप्पल, मोठ्या पिशव्या आणि प्रतिबंधित वस्तू इत्यादी मंदिरापासून सुरक्षितपणे दूर ठेवाव्यात.
व्हीआयपी दर्शन बंद राहणार
दर्शन पास, व्हीआयपी दर्शन पास, मंगला आरती पास, शृंगार आरती पास आणि शयन आरती पास 16, 17, 18 आणि 19 एप्रिल रोजी जारी केले जाणार नाहीत. ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ तर्फे श्री रामजन्मभूमी प्रवेशद्वारावर, बिर्ला धर्मशाळेसमोर, सुग्रीव किल्ल्याखाली एक प्रवासी सेवा केंद्र उभारण्यात आले आहे, ज्यामध्ये सार्वजनिक सुविधा उपलब्ध आहेत.
अयोध्या महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे 80 ते 100 ठिकाणी एलईडी स्क्रीन बसवून श्री रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. हे कार्य प्रसार भारतीच्या वतीने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आले आहे. त्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध होणार आहे.
राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, रामनवमीच्या दिवशी 12:16 वाजता सुमारे 5 मिनिटे सूर्यकिरणे प्रभू रामललाच्या कपाळावर पडतील, यासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक व्यवस्था करण्यात येत आहे. शास्त्रज्ञ हे अलौकिक क्षण पूर्ण भव्यतेने प्रदर्शित करण्यात व्यस्त आहेत. मंदिराचे उर्वरित कामही डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.