शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हबाबत मोठी अपडेट, सुप्रीम कोर्टातील घडामोड काय?
MLA Disqualification Case Update : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणाची सुनावणी आज होणार असल्याचे समोर आले होते. पण आता याप्रकरणात अजून एक अपडेट समोर आली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे. या याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. प्रकरणात सुप्रीम कोर्टात 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. तर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर 21 ऑक्टोबरला आता सुनावणी होईल.
सुनावणी सातत्याने लांबणीवर
राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले नसले तरी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत. या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने केली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. यापूर्वी सुनावणी दोन आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. ही सुनावणी आज होणार असल्याचे समोर आले होते. पण आता सुनावणी लांबणीवर पडली आहे. या याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू आहे. आता सुप्रीम कोर्टात 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. तर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर 21 ऑक्टोबरला आता सुनावणी होईल.
मोदी-सरन्यायाधीश भेटीवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. या भेटीवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. शिवसेना राष्ट्रवादी संपवण्यासाठी आता न्यायालयाची मदत घेतली जाते का असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. तरी निर्णय आणि निकाल होत नाही ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोचले. त्याच्यामुळे काही वेगळं काय घडतंय का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का? या लोकांच्या मनातला शंका काल घट्ट झाल्या. पक्क्या झाल्या असा जोरदार हल्ला त्यांनी केला.
सरन्यायाधीशांनी प्रकरणातून वेगळं व्हावं
सरन्यायाधीशांनी आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या याचिकांमधून वेगळं व्हावं. त्यांनी यासर्व प्रकरणात नॉट बिफोर मी करायला हवं. पंतप्रधान या याचिकांमध्ये प्रतिवादी आहेत. त्यांच्यासोबत सरन्यायाधीशांचे नाते खुलेआम स्पष्ट दिसत आहेत. अशात चंद्रचूड आम्हाला न्याय देऊ शकतील का? या प्रकरणात सातत्याने तारीख पे तारीख होत असल्याचा आरोप राऊतांनी केला.