लसींच्या खरेदीचा लेखाजोखा दोन आठवड्यात सादर करा; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

कोरोनापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने देशातील नागरिकांचं लसीकरण सुरू केलं. पण लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम थांबली आहे. (Supreme Court pulls up Centre on vaccines, asks if policy is to make states compete)

लसींच्या खरेदीचा लेखाजोखा दोन आठवड्यात सादर करा; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश
Supreme Court
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 6:50 PM

नवी दिल्ली: कोरोनापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने देशातील नागरिकांचं लसीकरण सुरू केलं. पण लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम थांबली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून लसीकरणाची इत्थंभूत माहिती मागवली आहे. (Supreme Court pulls up Centre on vaccines, asks if policy is to make states compete)

लसींची खरेदी केव्हा केव्हा केली याचा संपूर्ण लेखाजोखा द्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. त्यासाठी कोर्टाने केंद्र सरकारला दोन आठवड्याची मुदत दिली आहे. लसीकरणाच्या पहिल्या तीन टप्प्यात दोन डोस घेणारे किती टक्के लोक आहेत, त्याची आकडेवारी द्या. तसेच शहरी भागातील किती लोकांचे लसीकरण झाले आणि ग्रामीण भागातील लोक लोकांचे लसीकरण झाले याचीही आकडेवारी द्या, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.

सर्वच लसींची माहिती द्यावी लागणार

दरम्यान, कोर्टाच्या निर्देशानुसार आता केंद्र सरकारला कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुतनिक व्ही या लसींची माहिती द्यावी लागणार आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात किती व्हॅक्सिनची ऑर्डर दिली. किती मिळाली, कोणत्या तारखेला मिळाली आणि कोणत्या व्हॅक्सिनची ऑर्डर दिली याची माहिती केंद्राला द्यावी लागणार आहे.

लसीकरणाची माहितीही द्यावी लागणार

तसेच आगामी काळात केंद्र सरकार लसीकरण कशाप्रकारे करणार आहे, त्यांचं प्लानिंग काय आहे याची माहितीही केंद्राला द्यावी लागणार आहे. तसेच ब्लॅक फंगसच्या औषधांची परिस्थिती काय आहे, त्यासाठी केंद्राने काय पाऊल उचलले आहेत, याची माहितीही द्यावी लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार कोर्टाला काय माहिती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सव्वा लाख नव्या रुग्णांची भर

गेल्या 24 तासात देशात 1 लाख 32 हजार 788 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 207 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 31 हजार 456 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 83 लाख 7 हजार 832 वर गेला आहे. देशात 2 कोटी 61 लाख 79 हजार 85 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 35 हजार 102 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 17 लाख 93 हजार 645 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 21 कोटी 85 लाख 46 हजार 667 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Supreme Court pulls up Centre on vaccines, asks if policy is to make states compete)

संबंधित बातम्या:

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प वाढ, कोरोनाबळींचे आकडे 400 ने वाढले

कोरोना काळात पुदिन्याच्या चटणीचा आहारात करा समावेश; इम्युनिटी वाढवण्याबरोबरच मिळतील बरेच लाभ

‘ऑगस्टपासून दररोज 1 कोटी लोकांचं लसीकरण होणार, डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणार’, ICMR चा दावा

(Supreme Court pulls up Centre on vaccines, asks if policy is to make states compete)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.