बुलडोजर सरकारचा उदो उदो कशाला? सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारचे टोचले कान, Bulldozer Action वर आता सुप्रीम लगाम

Supreme Court on Bulldozer Action : उत्तर प्रदेशातील बुलडोजर बाबांना सर्वोच्च झटका बसला. सुप्रीम कोर्टाने देशभरात बुलडोजर कारवाईला लगाम घातला. मंगळवारी याविषयीचा आदेश न्यायालयाने दिला. पुढील सुनावणीपर्यंत अशा सर्व कारवायांना पायबंद घालण्यात आला आहे.

बुलडोजर सरकारचा उदो उदो कशाला? सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारचे टोचले कान, Bulldozer Action वर आता सुप्रीम लगाम
बुलडोजर बाबांना सुप्रीम झटका
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 5:03 PM

सर्वोच्च न्यायालायने देशभरात बुलडोजर कारवाईला मंगळवारी (17 सप्टेंबर) पायबंद घातला. प्रकरणात 1 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होईल. पुढील सुनावणीपर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने लगाम घातला. बुलडोजर बाबाचे स्तोम कशासाठी? बुलडोजर कारवाईचा उदो उदो कशासाठी असे सुद्धा न्यायालयाने सरकारला खडसावले आहे. या निर्णयामुळे योगी आदित्यनाथ सरकारला मोठा झटका बसला आहे. आदित्यनाथ सरकारच्या बुलडोजर कारवाईविरोधात जमीयत उलेमा ए हिंद यांनी याचिका दाखल केली होती. अर्थात निकालपत्रात कारवाई कुठे करता येणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

बेकायदा बांधकामांना नाही लागू निर्देश

सुप्रीम कोर्टाच्या या ताज्या आदेशाने येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत बुलडोजर ॲक्शन घेण्यावर बंदी घातली आहे. पण रस्ते, पदपथ आणि रेल्वेमार्गांवर अतिक्रमण करून केलेल्या बेकायदा बांधकामांना हे निर्देश लागू नसतील, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर बुलडोजर कारवाईविषयी देशात एक दिशा निर्देश देण्यात येईल, असे न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

आमच्या परवानगीशिवाय नाही बुलडोजर नाही चालणार

न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. विविध राज्यात, सरकारद्वारे दंडात्मक उपाय आणि आरोपींची इमारत तोडण्याच्या कारवाईविरोधात दाखल याचिकेत हा निकाल देण्यात आला. येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत आमच्या परवानगी विना देशात कुठेच बुलडोजर कारवाई होता कामा नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात बुलडोजर कारवाईविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानुसार, भाजपशासित राज्यांमध्ये मुस्लीम व्यक्तींविरोधात बुलडोजर कारवाई होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर हरकत घेतली. अधिकाऱ्यांचे हात अशा प्रकारे बांधता येणार नाही, असे त्यांनी सरकारच्या वतीने म्हणणे मांडले. अर्थात रस्ते, पदपथ आणि रेल्वेमार्गांवर अतिक्रमण करून केलेल्या बेकायदा बांधकामांना हे निर्देश लागू नसतील, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.