special report: गायकवाड कमिशनचाच डेटा मराठा आरक्षणाच्याविरोधात गेला?; वाचा कोर्टानं ‘त्या’ प्रत्येक मुद्यावर काय म्हटलंय?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. (Supreme Court Strikes Down Maratha Quota, read to the point)

special report: गायकवाड कमिशनचाच डेटा मराठा आरक्षणाच्याविरोधात गेला?; वाचा कोर्टानं 'त्या' प्रत्येक मुद्यावर काय म्हटलंय?
Maratha reservation-Supreme Court
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 5:46 PM

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारने नेमलेल्या गायकवाड कमिशनचा डेटाच मराठा आरक्षणाच्या विरोधात गेल्याचं दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या प्रत्येक मुद्द्यावर काय भाष्य केलं? त्याचा घेतलेला हा आढावा. (Supreme Court Strikes Down Maratha Quota, read to the point)

50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याचं म्हटलं आहे. मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवून 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण द्यावं, अशी अपवादात्मक परिस्थिती नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

न्यायालय काय म्हणाले?

” गायकवाड आयोग आणि उच्च न्यायालयाने मराठा समाजाला 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्याची कोणतीच परिस्थिीती निर्माण केली नाही. त्यामुळे ही मर्यादा ओलांडण्यासाठी कोणतीच अपवादात्मक परिस्थिती नसल्याचं आम्हाला दिसून आलं आहे.”

ज्या अधिनियमाद्वारे आरक्षण दिलं जातं, त्या अधिनियमानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणताही परिस्थिती निर्माण केलेली नाही. समानतेच्या सिद्धांताचे उल्लंघन करून मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास ठरवून 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यात आले. त्याच धर्तीवर घटनापीठाने महाराष्ट्र एसीईबीसी अधिनियम रद्द केला. घटनापीठाने नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण रद्द केलं. मात्र, 09.09.2020च्या निर्णयाअंतर्गत मराठा आरक्षणातून देण्यात आलेले पीजी मेडिकल प्रवेश सुरू राहणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देताना 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडून देण्यासाठी लागणारी कोणतीही असाधारण परिस्थिती नसल्याचं आम्हाला आढळून आलं आहे. महाराष्ट्र एसईबीसी अधिनियम2018मध्ये संविधानातील कलम 16 नुसार समतेच्या तत्त्वाचं उल्लंघन केलं आहे. कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना आरक्षण देण्यात आल्याने संविधानाच्या कलम 14 आणि 16चं उल्लंघन करून एकप्रकारे अल्ट्रा वायर्स  (शक्तीहिन) बनले आहे.

घटनापीठाने महाराष्ट्र एसईबीसी अधिनियम, 2018ला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी केली. नोकरी आणि शिक्षणातील मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या या याचिका होत्या.

जस्टिस अशोक भूषण, जस्टिस एल. नागेश्वर राव, जस्टिस अब्दुल नजीर, जस्टिस हेमंत गुप्ता आणि जस्टिस एस. रवींद्र भट आदी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने सलग दहा दिवस सुनावणी करून 26 मार्च रोजी मराठा आरक्षणावरील निकाल राखून ठेवला होता.

जस्टिस अशोक भूषण, जस्टिस एल. नागेश्वर राव, जस्टिस हेमंत गुप्ता आणि जस्टिस एस. रवींद्र भट यांनी याप्रकरणावर निर्णय दिला.

मराठ्यांनी सेवेत पुरेसे प्रतिनिधीत्व केले:

सरकारी नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या प्रतिनिधीत्वाचे आकडे पाहिल्यानंतर मराठ्यांनी नोकऱ्यांमध्ये पुरेसं प्रतिनिधीत्व केल्याचं कोर्टाने मान्य केलं.

“वरिल सादरीकरणानुसार ग्रेड ए, बी, सी आणि डीमधील मराठ्यांचे प्रतिनिधीत्व पुरेसे आणि समाधानकारक आहे. सार्वजनिक सेवेत अशा प्रकारच्या अनेक पदांवर काम करणारा एक समुदाय हा समाजासाठी अभिमानास्पद आहे आणि त्याचे प्रतिनिधित्व कोणत्याही प्रकारे करता येणार नाही. तरीही सार्वजनिक सेवेत त्यांचं पुरेसं प्रतिनिधीत्व नसल्याचे सांगितले गेले आहे. मागासवर्गीयांचे पुरेसे प्रतिनिधित्व न करण्याची घटनात्मक पूर्वअटी पूर्ण होत नाही. गायकवाड आयोगाने सादर केलेल्या वरील आकडेवारीच्या आधारे राज्य सरकारने मत तयार केली आहेत. या रिपोर्टच्या आधारेच सरकारची मते बनली आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संवैधानिक तरतुदींचा पाठपुरावा न करणं हे आश्चर्यकारक आहे,” असं कोर्टाने म्हटलं आहे.

समाजाच्या लोकसंख्येवर आधारीत आरक्षण देण्याची गरज नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. कलम 16(4) अन्वये आरक्षणासाठी राज्यात जे आवश्यक आहे, ते प्रमाणित प्रतिनिधीत्व नाही तर पुरेसे प्रतिनिधीत्व आहे. परंतु, गायकवाड आयोगाचा अहवाल प्रमाणित प्रतिनिधीत्वाच्या आधारे पुढे सरकवला गेला आहे.

मराठा समाजाच्या संबंधात कलम 16 (4)चा लागू करणअयासाठी संवैधानिक पूर्वानुमती, गायकवाड आयोगाचा अहवाल आणि कायदे दोन्ही आवश्यक आहेत. त्यामुळे मराठा समाजर कलम 16 (4) अन्वये कोणत्याही आरक्षणासाठी पात्र नव्हता. कलम 16 (4) अन्वये आरक्षण देणं असंवैधानिक असून हे आरक्षण कायम ठेवलं जाऊ शकत नाही, असं कोर्टाने सांगितलं.

मराठा समाज मागास नाही

वस्तुस्थिती आणि आकडेवारी पाहता गायकवाड आयोगानेच मराठा विद्यार्थी खुल्या स्पर्धेत यशस्वी झाल्याचं नमूद केलं आहे. तसेच या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तरसह इतर सर्व क्षेत्रात प्रवेश मिळवला आहे. त्यांची टक्केवारी इतरांपेक्षा खचितही नगण्य नसल्याचं गायकवाड आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

IAS, IPS आणि IFSमध्ये खुल्या प्रवर्गातील भरलेल्या उमेदवारांपैकी मराठा विद्यार्थ्यांची टक्केवारी 15.52, 27.85 आणि 17.97 टक्के असल्याचं नमूद केलं आहे. प्रतिष्ठित सेवांमधील मराठा समाजाचं हे प्रतिनिधीत्व पर्याप्त आणि पुरेसं आहे.

मराठा समाजाचे अभियांत्रिकी, वैद्यकीय, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि इतर उच्च शिक्षणातील पोस्ट आणि केंद्रीय सेवांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधीत्व लोकसंख्येच्या आधारावर नाही. त्यामुळे हे केवळ त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचे संकेत नाही, असं कोर्टाने नमूद केलं आहे.

“आयोगाने जे आकडे आणि वस्तुस्थिती एकत्र केली आहे. त्यावरून मराठा समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. गायकवाड आयोगाने आपल्या चिन्हांकित प्रणाली संकेतक आणि चिन्हांकिताद्वारे जे निष्कर्ष काढले आहेत. ते मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसे नाहीत, ” असं कोर्टाने म्हटलं आहे.

इंदिरा साहनी खटल्यातून निर्धारित करण्यात आलेल्या आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेवर पुनर्विचार करण्याची गरज नाही.

इंदिरा साहनी प्रकरणी 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने घालून दिलेल्या 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर पुनर्विचार करण्याची गरज नसल्याचं घटनापीठाने स्पष्ट केलं. इंदिरा साहनी प्रकरणातील आदेशाचं अनेक निर्णयात पालन करण्यात आलं आहे. तसेच त्याला मंजुरीही दिली आहे. तसेच परिस्थितीनिहाय या निर्णयाचा पुनरुच्चार केला आहे, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.

संपूर्ण निकालाची प्रत डाऊनलोड करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी क्लिक करा:

कोर्टाने अनेक वरिष्ठ वकिलांचे हे मुद्दे ऐकले होते:

>> आरक्षणावर 50 टक्क्यांची मर्यादा लावताना इंदिरा साहनी खटल्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची गरज आहे.

>> मागासांच्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना करणाऱ्या 102व्या घटना दुरुस्तीने ओबीसींची ओळख पटविण्याचा अधिकार काढून घेतला आहे का?

>> 50 टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडत मराठ्यांना 16 टक्के आरक्षण देणारी अपवादात्मक परिस्थिती महाराष्ट्रात आहे का?

>> सकारात्मक कारवाई केवळ आरक्षणापर्यंतच मर्यादित आहे का?

>>  102व्या घटना दुरुस्तीने ओबीसींची ओळख पटविण्याच्या राज्यांच्या अधिकारांना नष्ट केलेलं नाही, असं देशाचे अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी कोर्टाला सांगितलं होतं. घटना दुरुस्ती केवळ केंद्रीय यादीतील ओबीसींच्या ओळख पटवण्याबाबत मर्यादित आहे, असंही वेणुगोपाल यांनी सांगितलं होतं.

तर, भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकार मराठा आरक्षणाचं समर्थन करत असल्याचं म्हटलं होतं.

जून 2019मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यानुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग(एसईबीसी) अधिनियम 2018 कायम ठेवला होता. या अधिनियमाद्वारे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत अनुक्रमे 12 आणि 13 टक्के आरक्षण देण्यात आले. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका घटनापीठासमोर सुनावणीसाठी आल्या होत्या. इंदिरा साहनी विरुद्ध भारत संघ (1992) प्रकरणातील निर्धारित सिद्धांतांचं उल्लंघन झालं आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयानेही आरक्षणाची मर्यादा 50 टक्के ठेवली होती, असं या याचिकेत म्हटलं होतं.

बॉम्बे हायकोर्टाने मराठा आरक्षण कायम ठेवत सांगितले होते की, 16 टक्के आरक्षण न्यायसंगत नाही. त्यामुळे मराठा समाजाला रोजगारात 12 तर शिक्षणात 13 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असता कामा नये, असं कोर्टाने म्हटलं होतं.

राज्य सरकारला संविधानातील (102) दुरुस्तीनंतर एखाद्या वर्गाला सामाजिक किंवा आर्थिक दृष्ट्या मागास ठरविण्याची शक्ती आहे का? हे ठरविण्यासाठी 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे प्रकरण मोठ्या पीठाकडे वर्ग केलं होतं. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करतानाच मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. (Supreme Court Strikes Down Maratha Quota, read to the point)

संबंधित बातम्या:

Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, कोर्टात कोण काय म्हणालं? ते वाचा सविस्तर

Maratha Reservation Live | मराठा समाजासाठी हा दिवस दुर्दैवी दिवस : खासदार संभाजीराजे

मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, राष्ट्रपती, पंतप्रधानांना हातजोडून विनंती; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

(Supreme Court Strikes Down Maratha Quota, read to the point)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.