Supreme Court on Same Sex Marriage | समलैंगिक विवाहाबद्दल कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

Supreme Court on Same Sex Marriage | समलैंगिक विवाहाबद्दल सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिलाय. आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचन झाले. 5 न्यायाधीशांच्या संविधान पीठाने निकाल दिला.

Supreme Court on Same Sex Marriage | समलैंगिक विवाहाबद्दल कोर्टाचा महत्त्वाचा निकाल
Supreme Court Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 1:22 PM

नवी दिल्ली : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाला आलाय. 5 न्यायाधीशांच्या संविधान पीठाने 3-2 ने हा निकाल दिलाय. CJI आणि न्यायाधीश संजय किशन कौल यांचं एकमत आहे, तेच जस्टिस भट, जस्टिस कोहली आणि जस्टिस नरसिम्हा यांचं दुसर मत आहे. सर्व पाचही न्यायाधीशांनी केंद्राच्या समितीला विचार करण्यास सांगितलं आहे. CJI डीवाय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं की, “समलैंगिक जोडप्यांच्या विवाहाला मुलभूत अधिकार म्हणून मान्यता देता येणार नाही” . “न्यायालय कायदा बनवत नाही. पण कायद्याची व्याख्या करुन अमलबजावणी करु शकतं” असं CJI म्हणाले. समलैंगिकतेवरुन केंद्र आणि राज्य सरकारने भेदभाव संपुष्टात आणावा. हे नैसर्गिक आहे. समलैंगिक समुदायासोबत भेदभाव करु नये, असं न्यायाधीशांनी म्हटलय. समलैंगिक जोडप्यांच्या विवाहाला वैध मानण्यास कोर्टाने नकार दिलाय.

कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही हार्मोनल थेरेपीमधून जाण्यासाठी भाग पाडू नये. समलैंगिकांच्या अधिकारांबद्दल जनतेला जागरुक कराव. समलैंगिक समुदायासाठी हॉटलाइन बनवा. समलैंगिक जोडप्यांसाठी सुरक्षित घर बनवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. समलैंगिकांना सामाजिक आणि कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी सरकारने कायदा बनवावा असं जस्टिस रवींद्र भट यांनी म्हटलय. कुठलीही बाधा किंवा भीतीशिवाय समलैंगिकांना आपल्या संबंधांचा अधिकार मिळाला पाहिजे असं रवींद्र भट म्हणाले. “समलैंगिकता हा नवा विषय नाही, लोक समलैंगिक असू शकतात. भले ते गावातील असतील किंवा शहरातील. शिवाय इंग्रजी बोलणारा पुरुष समलैंगिकतेवर दावा करू शकतो, अस नाही, तर ग्रामीण भागात शेतात काम करणारी महिलाही दावा करू शकते” असं सीजेआयने म्हटलं. ‘आम्हाला हस्तक्षेप करण्यास आर्टिकल 32 अंतर्गत अधिकार’

“स्पेशल मॅरेज ॲक्ट मध्ये बदल करावेत की नाही याचा विचार करणे हे संसदेचे काम आहे. न्यायालयाने विधिमंडळाच्या कामात हस्तक्षेप करू नये” असं चीफ जस्टीस यांनी म्हटलं. “सरकारच मत आहे की, कोर्टाने यात हस्तक्षेप करायला नको. आम्हाला हस्तक्षेप करण्यास आर्टिकल 32 अंतर्गत अधिकार मिळतात. नागरिकांच्या मूलभूत अधिकाराची सुरक्षा करणे, ही कोर्टाची जबाबदारी आहे” असं मुख्य न्यायाधीशांनी म्हटलय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.