Surat, Girl Murder : सुरतच्या ग्रीष्मा हत्याकांडावर लवकरच निर्णयाची शक्यता, 2 हजार पानांच्या आरोपपत्रात 190 साक्षीदारांचे जबाब
12 फेब्रुवारीला सुरतच्या कामरेज भागात ग्रीष्मा वेकारियाची हत्या झाली होती. त्यावेळी चार दिवसांत आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणात न्यायालयात दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. तर या प्रकरणावर लवकरच निर्णयाची शक्यता आहे.
दिल्ली : 12 फेब्रुवारीला सुरतच्या कामरेज भागात ग्रीष्मा वेकारियाची हत्या (Girl Murder) झाली होती. ही हत्या (Murder) आरोपी फेनिल गोयानी याने केली होती. त्यावेळी चार दिवसांनंतर आरोपीला पोलिसांनी (Police) अटक केली होती. याप्रकरणात न्यायालयात दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. तर या प्रकरणावर लवकरच निर्णयाची शक्यता आहे. बहुचर्चित ग्रीष्मा हत्या प्रकरणाला गांभीर्याने घेत गुजरात सरकारने या खटल्याचा वेग वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांतर 28 फेब्रुवारीपासून सुरत न्यायालयात रोज सुनावणी सुरू होती. या हत्या प्रकरणाची सुरत न्यायालयात 7 एप्रिलला सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणातील आरोपी फेनिलला अटक केल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची आहे. आता या प्रकरणाची लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
43 दिवसांपूर्वीच हत्येची माहिती
सुरतचे मुख्य सरकारी वकील नयन भाई यांनी सांगितलं की, आरोपी गोयानी याने डिसेंबरपासून इंटरनेटवर एके-47शोधली, हत्येपूर्वी वेब सीरिज पाहिली आणि ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरुन चाकू मागवण्याचा प्रयत्न केला. एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधून चाकू खरेदी करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर फेनिलने 31 डिसेंबर 2021 रोजी त्याचा मित्र कृष्णाला इंस्टाग्रामवर ग्रीष्मा वेकारियाच्या हत्येबद्दल सांगितलं होतं. आरोपींनी ग्रीष्माच्या हत्येचा पूर्वनियोजित कट रचला होता, असे सर्व पुराव्यांवरुन स्पष्ट होते.
घटनाक्रम कसा आहे?
या हत्या प्रकरणाची सुरत न्यायालयात 7 एप्रिलला सुनावणी पूर्ण झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने 16 एप्रिलला आरोपी फेनिल गोयानी याला शिक्षा सुनावली होती. या प्रकरणातील आरोपी फेनिलला अटक केल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती आहे. गुजरात सरकारने याप्रकरणी लवकर काम करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावण्या तातडीने झाल्या.
एसआयटीमध्ये 50 पोलिसांचा समावेश
या हत्येप्रकणी सुरत पोलिसांनी अडीच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यावरुन किती तातडीने या प्रकराणाची दखल घेतली गेले हे कळते. यामध्ये 190 साक्षीदारांचे जबाब घण्यात आले आहेत. तपासादरम्यान एकाही साक्षीदाराला किंवा प्रत्यक्षदर्शीला पोलीस ठाण्यात बोलवले नसून, त्यांच्या घरी जाऊन त्यांचे जबाब नोंदवल्याचा दावा पोलिसांनी केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. यामध्ये तब्बल पन्नास पोलिसांचा समावेश होता. आता याप्रकरणात लवकरच निर्णयाची शक्यता आहे. कारण, गुजरात सरकारने विशेष लक्ष घालून या प्रकरणाची कार्यवाही तातडीने करुन घेतली. सरकारी पक्षाकडून सर्व पुरावे सादर करण्यात आले. आता प्रतीक्षा निर्णयाची आहे.
इतर बातम्या
Aliya Bhatta- Kapoor : खास पोस्ट लिहित आलियाने शेअर केले मेहंदीच्या सोहळ्याचे फोटो