‘सुशासन महोत्सव’त देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत
नवी दिल्लीत आजपासून दोन दिवस सुशासन महोत्सव आयोजित केला आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून हा महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत होणार आहे.
नवी दिल्ली, दि. 9 फेब्रुवारी 2024 | दिल्लीत आजपासून ‘सुशासन महोत्सव‘ आयोजित केला आहे. दोन दिवस 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी हा महोत्सव होणार आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सावात आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत होणार आहे. या सुशासन महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा करणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री सामील होणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री मसुख मंडाविया आणि जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हाही उपस्थित राहणार आहेत.
कोणा कोणाची उपस्थिती
नवी दिल्लीतील जनपथ रोडवरील आंबेडकर इंटर नॅशनल सेंटरमध्ये सुशान महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपशासित राज्यातील इतर मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी दुपारी 4 वाजता सुशासन महोत्सवाला सुरुवात होणार आहे.
दुपारी 4 ते 4.30 वाजेपर्यंत महोत्सवातील स्टॉल्सचं उद्घाटन होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि पुनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा यांच्या हस्ते होणार आहे.
- संध्याकाळी 5.30 ते 6.15 वा- आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांची मुलाखत
- संध्याकाळी 6.15 ते 6.45 वा.- खासदार आणि भाजयूमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांची मुलाखत
- संध्याकाळी 6.45 ते 7.30 वा.- केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची मुलाखत
- संध्याकाळी 7.30 ते रात्री 8.15 वा. – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत
दुसरा दिवस…
- सकाळी 10.30 ते 11.15 वा. – निती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांची प्रकट मुलाखत
- सकाळी 11.15 ते दुपारी 12.15 वा.- जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची मुलाखत घेतली जाणार
- दुपारी 12.15 ते 1 वा. सर्व राज्यातील स्टॉल्सचे प्रतिनिधी येऊन एकत्र चर्चा करणार आहेत.
- दुपारी 2 ते 3 वा- नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इमना अलांग यांची मुलाखत
- दुपारी 3 ते 4 वा. – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांची मुलाखत.
- दुपारी 4 ते संध्याकाळी 5 वा.- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुलाखत
- संध्याकाळी 5 ते 6 वा. – नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची मुलाखत होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.