वेब सीरीजमध्ये काम केलेल्या IAS अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई, सोशल मीडियावर 30 लाख फॉलोअर्स

वेब सीरीजमध्ये अभिनय केलेल्या आयएस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने ही कारवाई केली आहे. जाणून घ्या या मागचं नेमकं कारण काय...

वेब सीरीजमध्ये काम केलेल्या IAS अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई, सोशल मीडियावर 30 लाख फॉलोअर्स
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 8:31 PM

मुंबई : नेटफ्लिक्स वरील दिल्ली क्राईम सीझन-2 मध्ये भूमिका साकरणाऱ्या आयएएस अधिकारी अभिषेक सिंग यांना निलंबित करण्यात आलंय. योगी आदित्यनाथ सरकारने कोणतेही कारण न सांगता रजेवर गेल्यामुळे ही कारवाई केली आहे. आयएएएस अधिकाऱ्याचं 82 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिषेक सिंगच्या कुटुंबातील सर्व सदस्य आयएएस किंवा आयपीएस आहेत. अभिषेक सिंग यांचे मुंबईत अनेकांसोबत चांगले संबंध आहेत. यापूर्वी त्यांनी आयपीएस कॅडरमध्ये असताना मुंबईत डीसीपी म्हणून काम केले आहे.

अनेक दिवसांपासून कामावर हजर नसल्याने आणि नोटीस न देता दीर्घ रजेवर गेल्यामुळे योगी सरकारने आयएएस अधिकारी अभिषेक सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. कार्यालयाची शिस्त न पाळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

याआधी देखील निवडणूक आयोगाने अभिषेक सिंह यांना सेवेतून काढून टाकले होते. त्यांना गुजरात निवडणूक आयोगाने निरीक्षक म्हणून प्रतिनियुक्तीवर पाठवले होते. त्यावेळीही ड्युटीवर असताना त्यांनी आपल्या अधिकृत वाहनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे ते अडचणीत सापडले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली होती.

अभिषेक सिंग हे सोशल मीडिया चांलगेच चर्चेत राहणारे अधिकारी आहेत. त्यांचे 30 लाख फॉलोअर्स आहेत. नेटफ्लिक्सच्या दिल्ली क्राईम सीझन-2 वेबसिरीजमध्ये त्यांनी काम केले आहे. यासोबतच त्यांनी प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल आणि बी.प्रँक यांच्यासोबत एक म्युझिक अल्बमही रिलीज केला आहे. लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करून त्यांनी प्रसिद्धी मिळवली होती.

2011 च्या बॅचचे IAS अभिषेक हे UP कॅडरचे IAS अधिकारी आहेत. बुधवारी यूपी सरकारच्या नियुक्ती आणि कार्मिक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवेश चतुर्वेदी यांनी अभिषेक सिंग यांना सेवेतून निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. ग्लोबल इन्व्हेस्टर समिटमुळे यूपी सरकारने सर्व आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या 15 फेब्रुवारीपर्यंतच्या सुट्या रद्द केल्या आहेत.

आयएएस अभिषेक सिंग एका हाय प्रोफाइल कुटुंबातील आहे. त्यांची पत्नी दुर्गा शक्ती नागपाल या KUP कॅडरच्या 2009 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्यांचे वडील कृपाशंकर सिंह हे यूपी सरकारमध्ये आयपीएस अधिकारी आहेत. IAS मध्ये निवड होण्यापूर्वी अभिषेक सिंह देखील IPS अधिकारी होते. त्यांनी मुंबई पोलिसात डीसीपी म्हणून काम केले आहे. 2014 मध्ये दलित शिक्षकाशी गैरवर्तन केल्याच्या आरोपामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते.गेल्या ऑक्टोबरमध्येही रजेवर गेल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. 2015 मध्ये त्यांना प्रतिनियुक्तीवर दिल्लीला पाठवण्यात आले त्यानंतर त्यांनी 2018 पर्यंत रजा वाढवली होती. आता पुन्हा ते 82 दिवसांसाठी निलंबित झाले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.