पतीला गुप्त रोग असल्याचा संशय, संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा पत्नीवर हत्येचा आरोप

तन्नूने 16 नोव्हेंबर रोजी अजयला घरी आल्यानंतर पत्नी तन्नूने त्याला कोल्डड्रिंक प्यायला दिले. कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर अजयची तब्येत बिघडली. तो जमिनीवर बेशुद्ध पडला.

पतीला गुप्त रोग असल्याचा संशय, संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा पत्नीवर हत्येचा आरोप
हरियाणातील पलवलमध्ये तीन मित्रांकडून मुस्लिम तरुणाची मारहाण करुन हत्या
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 6:13 PM

धनबाद : झारखंडमधील कोल शहर धनबादमध्ये एका व्यक्तीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अजय दास असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. अजयच्या पत्नीनेच त्याला विष पाजून मारले असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

पती-पत्नीमध्ये वाद सुरु होते

झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील महुदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात मृत अजय दास आणि त्याची पत्नी तन्नू कुमारी हे राहत होते. दोन वर्षांपूर्वीच अजय आणि तन्नू यांचा विवाह झाला होता. मात्र पती-पत्नीमध्ये सतत वाद सुरु असायचे. पतीला गुप्त रोग झाल्याचा पत्नीला संशय होता तर पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा पतीला संशय होता. याच संशयातून पती-पत्नीमध्ये रोज भांडण आणि मारहाण होत असे. अजयनेही मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, लग्न झाल्यापासूनच त्याच्या पत्नीला त्याच्यासोबत रहायचे नव्हते. तिने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला उद्धवस्त करण्याची धमकीही दिली होती.

पत्नीने कोल्डड्रिंकमधून विष पाजून हत्या केल्याचा आरोप

तन्नूने 16 नोव्हेंबर रोजी अजयला घरी आल्यानंतर पत्नी तन्नूने त्याला कोल्डड्रिंक प्यायला दिले. कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर अजयची तब्येत बिघडली. तो जमिनीवर बेशुद्ध पडला. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी बोकारो बीजीएच रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्याला रांची मेडिका रुग्णालयात हलविण्यात आले. रांचीच्या मेडिको रुग्णालयात उपचारादरम्यान अजयचा मृत्यू झाला. अजयच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी सुनेवर मुलाच्या हत्येचा आरोप केला आहे. पती-पत्नीतील वादातूनच तन्नूने अजयला कोल्डड्रिंकमधून विष पाजून त्याची हत्या केल्याचा त्याच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे.

नातेवाईकांकडून सुनेला आणि तिच्या आई-वडिलांना अटक करण्याची मागणी

मृताच्या नातेवाईकांनी त्याची पत्नी, सासू, सासरे यांना अटक करण्याची मागणी करीत मृतदेह महुदा पोलीस ठाण्यासमोर ठेवला आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, पती-पत्नीमध्ये रोज भांडणे, मारहाण होत होती. पती-पत्नीला एकमेकांवर संशय होता. मृत्यूपूर्वी अजय दासने बोकारो येथील बीजीएच रुग्णालयात सेक्टर-4 पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेल्या जबाबात सांगितले की, अमलाबाद पोलीस ठाण्याच्या तलगढिया अंतर्गत सिरफोर बस्ती येथील मिहिर दास यांची मुलगी तन्नू कुमारी हिच्यासोबत दोन वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. परंतु लग्नानंतर त्याच्या पत्नीला पतीसोबत नांदायचे नव्हते.

अजयच्या पत्नीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप

मृत अजयच्या भावाने सांगितले की, वहिनीने कोल्डड्रिंकमध्ये विष देऊन भावाची हत्या केली. मृत अजयच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या सुनेचे एका तरुणासोबत अवैध संबंध आहेत. रात्री उशिरापर्यंत ती कोणाशी तरी लपून बोलायची. अजयने बोलण्यास मनाई केल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू, अशी धमकी ती द्यायची. मृताच्या वडिलांनी सांगितले की, सून आणि तिच्या आई-वडिलांनी माझ्या मुलाचा कोल्ड्रिंकमध्ये विष टाकून खून केला आहे. पीडिताच्या कुटुंबियांनी आता प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. (Suspicious death of a young man after drinking a cold drink in jharkhand)

इतर बातम्या

ऑनलाईन गांजा विक्री प्रकरण; अ‍ॅमझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरोधात गुन्हा दाखल

मुंबईत अभिनेत्याची पत्नी हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत, बड्या उद्योगपतींकडून कोट्यवधी उकळले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.