Gyanvapi Mosque: पूजा करण्यापासून रोखले म्हणून स्वामी अविमुक्तेश्वरांनी अन्न-पाणी त्यागलं! ज्ञानवापीवरुन हायवोल्टेज ड्रामा
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी दुसऱ्यांदा पोलिसांकडे ज्ञानवापी परिसरात पूजा करण्याची परवानगी मागितली आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाच्या दाखल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी नवा पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी आमच्याकडून पूजा सामग्री न्यावी आणि आराध्य देवताची पूजा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाराणसी- ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Mosque)शिवलिंगाची पूजा करण्यापासून रोखले म्हणून सरस्वती श्रीविद्या मठाचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद (Swami Abimukteshwaranand)हे उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत ज्ञानवापीतील आदि विश्वेश्वराची पूजा करणार नाही, तोपर्यंत अन्न-पाणी ग्रहण करणार नाही, असा पवित्रा स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी घेतला आहे. अविमुक्तेश्वरानंदांचे म्हणणे आहे की- ज्ञानवापीत सापडलेले शिवलिंग हे आदि विश्वेश्वराचे प्राचीन ज्योतिर्लिंग आहे. देवतेत प्राण असतो महणून त्याची पूजा (Pooja)केली जाते. भगवंताला उपाशी-तापाशी ठेवता येत नाही. त्यांचा अभिषेक, शृंगार, पूजा, भोग-राग हे सगळे नियमित व्हायला हवे. शनिवारी या ठिकाणी पूजा करु अशी घोषणा स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केली होती. शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांच्या आदेशाने ही पूजा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या घोषणेनंतर पोलिसांनीही कठोर भूमिका घेत, असे केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता
दिवसातून एकदा पूजेच्या परवानगीची मागणी
आमच्या अराध्य दैवताची दिवसातून एकदा पूजा करण्याची छोटी मागणी असल्याचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले. पोलिसांनी आमचा रस्ता अडवून धरला आहे. पोलीस त्यांचे काम करतील, आपण आपले काम करु. प्रत्येक समानतनी धर्म मानणाऱ्याला पूजेचा मौलिक अधिक अधिकार आहे. ज्ञानवापीत पूजेला परवानगी मिळावी, यासलाठी वकील रमेश उपाध्याय यांच्या मार्फत जिल्हा कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांनी पूजा करावी, स्वामींची मागणी
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी दुसऱ्यांदा पोलिसांकडे ज्ञानवापी परिसरात पूजा करण्याची परवानगी मागितली आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाच्या दाखल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी नवा पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी आमच्याकडून पूजा सामग्री न्यावी आणि आराध्य देवताची पूजा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. देवाची पूजा न केल्याने मिळणाऱ्या पापाचे धनी होण्याची इच्छा नसल्याचे स्वामींचे म्हणणे आहे. आम्ही इकडे स्नान करावे, जेवावे आणि भगवंताला काही मिळू नये, हे चुकीचे असल्याचे त्यांचे महणणे आहे.
श्रीविद्या मठासमोर 10 पोलीस ठाण्यांचे पोलीस तैनात
श्री विद्या मठासमोर10 पोलीस ठाण्यांचे पोलीस कर्मचारी,3 मोठे अधिकारी यांच्याकडून नाकेबंदी करण्यात आली आहे. एकाअर्थी स्वामींना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जर धर्माचार्यांना वाईट वागणूक दिली तर काशीतील प्रत्येक मंदिरात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात रक्ताभिषेक करण्यात येईल असा इशारा विश्व हिंदू सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रशासनाने परवानगी नाकारली
त्यानंतर श्री विद्या मठाची नाकेबंदी करण्यात आली आहे. ज्ञानवापीत शिवलिंग सापडलेली जागा कोर्टाच्या आदेशाने 16 मेपासून सील करण्यात आली आहे. त्याठिकाणी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.