‘देश आई, तर शेतकरी बाप आहे’, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कलाकारही एकवटले

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) आणि अनेक कलाकारांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दिलाय.

'देश आई, तर शेतकरी बाप आहे', शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कलाकारही एकवटले
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 2:22 AM

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) आणि अनेक कलाकारांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दिलाय. शनिवारी (9 जानेवारी) टीकरी बॉर्डरवर ‘आर्टिस्ट्स फॉर फार्मर्स’ हा कार्यक्रमात आयोजित करण्यात आला. यात स्वरा भास्करसह हरभजन मान, जैसी बैंस, रब्बी शेरगिल आणि इतर अनेक पंजाबी गायक सहभागी झाले. याशिवाय कंवर ग्रेवाल, हर्फ चीमा, नूर चहल यांनी देखील कार्यक्रमात भाग घेतला. हा कार्यक्रम संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य मंचावर झाला (Swara Bhaskar Rabbi Shergill Harbhajan Mann show solidarity with Farmers Protest).

शेतकऱ्यांसमोर बोलताना स्वरा भास्कर म्हणाली, “मी येथे एक कलाकार म्हणून आले आहे. मी देशातील त्या नागरिकांचं प्रतिनिधीत्व करते जे शहरांमध्ये वाढले, मात्र कधी गावाकडे गेले नाही.’सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधातील लढा हा देशातील प्रत्येक नागरिकाचा लढा आहे. सर्वांची लढाई या आंदोलनाच्या माध्यमातून लढल्याबद्दल मी संपूर्ण देशाच्यावतीने आंदोलनकारी सर्व शेतकऱ्यांचे आभार मानते. थोरामोठ्यांची सेवा करण्याऐवजी त्यांना कडाक्याच्या थंडीत बसण्यास भाग पाडलं जात आहे. आपला समाज आणि देश या स्थितीपर्यंत पोहचला आहे याची मला लाज वाटते.”

“आम्ही इतके निर्लज्ज आणि अहंकारी झालो आहोत की कडाक्याच्या थंडीत बसलेल्या या शेतकऱ्यांचा त्रास आम्हाला जाणवतही नाही. जर देश आपली आई असेल, तर शेतकरी आपला बाप आहे. कारण तो आम्हाला दोन वेळचं अन्न देतो. काही लोक आंदोलक शेतकऱ्यांविरोधात चुकीचे आरोप करत आहेत. ते दररोज शिव्याशाप देत आहेत आणि नागरिकांना शेतकऱ्यांविरोधात भडकावत आहेत. त्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांची माफी मागते,” असंही स्वरा भास्करने नमूद केलं.

दरम्यान, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी 26 नोव्हेंबरपासून दिल्लीच्या विविध सीमांवर अगदी कडाक्याच्या थंडीतही आंदोलन करत आहेत. हे कायदे रद्द करावेत हीच त्यांची मुख्य मागणी आहे.

‘आपण ही लढाई देखील जिंकू’

नूर चहल म्हणाली, ‘मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. आपला इतिहास आपल्याला हेच सांगतो की याआधीही आपण अनेक लढाया जिंकल्या आहेत आणि ही लढाई देखील आपण जिंकू हा मला विश्वास आहे.’ विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला जवळपास सर्व पंजाबी गायकांनी पाठिंबा दिलाय. कंवर ग्रेवाल आणि चीमा सुरुवातीपासून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.

हेही वाचा :

तुम्ही तुमचं जेवण करा, आम्ही आमचं जेवून घेऊ; मंत्र्यांसोबत जेवण्यास शेतकऱ्यांचा नकार

शहाजहाँपूर बॉर्डरवर धुमश्चक्री; शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची 7 वी बैठक संपली, अद्यापही तोडगा नाहीच

Swara Bhaskar Rabbi Shergill Harbhajan Mann show solidarity with Farmers Protest

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.