Eknath Shinde : पूरस्थितीवर नियंत्रणासाठी यंत्रणा अलर्ट, जीवीतहानी टाळण्यावर भर, मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्याचा आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणच्या अतिवृष्टीची पाहणी केली आहे. पावसाने घरांची पडझड तर झालीच आहे पण पिकांचेही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. उघडीप देताच नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे. पाहणीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली.
मुंबई : राज्यात पावसाचा हाहाकार सुरु आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये (flood situation) पूरस्थिती निर्माण झाली आहे. जुलैच्या 1 तारखेपासून राज्यात सुरु असलेला पाऊस अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट असून कुठेही दुर्घटना होणार नाही त्या अनुशंगाने सूचना दिल्याचे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. विशेषत: जीवीतहानी टाळण्यावर सरकारचा भर राहणार आहे. राज्यात सर्वत्रच (Heavy Rain) पावसाने थैमान घातले आहे. कमी कालावधीत अधिकचा पाऊस आणि त्यामध्ये सातत्य राहिल्याने नुकसानीची तीव्रता आहे. पण राज्यभरातील आढावा घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही दिल्या असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
यंत्रणा अलर्टवर, नुकसान तिथे मदत
राज्यात सर्वत्रच पावसाने हाहाकार घातलेला आहे. विशेषत: कोल्हापूर, नाशिक, गडचिरोली, मुंबई, नांदेड, औरंगाबाद या जिलह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे पिकांचे तर नुकसान होतच आहे पण जीवीतहानी होऊ नये म्हणून प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. झालेले नुकसान भरुन काढता येईल पण जीवीतहानी झाल्यावर सर्व कुटुंबाचे नुकसान होते. त्यामुळे सर्वप्रथम जीवीतहानी कशी टाळता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गडचिरोलीत काही कमी पडणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणच्या अतिवृष्टीची पाहणी केली आहे. पावसाने घरांची पडझड तर झालीच आहे पण पिकांचेही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. उघडीप देताच नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे. पाहणीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी उर्वरित जिल्ह्यात काय स्थिती आहे याचा आढावा घेऊन नुकसानभरपाईसाठी आपण कमी पडणार नाही, केवळ जीवीतहानी टाळता येईल असे प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
तीन दिवस पावसाचेच
राज्यात आगामी तीन दिवसांमध्ये देखील मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला आहे. एवढेच नाहीतर सर्व राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी होते. याभागातही पाऊस बरसणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तर पश्चिम किनारपट्टीवरील द्रोणिय स्थितीचा परिणाम राज्यातील मान्सूनवर होणार आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.