तिरुपती बालाजीला जाताना या गोष्टीची काळजी घ्या; अन्यथा सहन करावा लागेल त्रास
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती येथे तिरूमला टेकडीवर स्थिर भगवान वेंकटेशाच्या मंदिरात भगवान विष्णूची पूजा केली जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी जातात. तुम्हीही तिरुपतीला दर्शनासाठी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
तिरुपती बालाजी हे दक्षिण भारतातील एक प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र आंध्र प्रदेश या राज्यात आहे. या मंदिरामध्ये व्यंकटेश्वर स्वामींची मूर्ती आहे. ज्याच्या दर्शनासाठी लोक जगभरातून येत असतात. या मंदिरात दररोज दर्शनासाठी लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. गर्दीमुळे कधीकधी येथे कधीकधी चेंगराचेंगरे सारख्या घटना देखील घडतात. कुठल्याही प्रकारची अनुचित घटना टाळण्यासाठी तिरुपती बालाजीच्या मंदिरात कोणत्या ऋतूमध्ये जाणे योग्य आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हीही तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जात असाल तर जाणून घ्या की कोणत्या वेळी तुम्ही तिथे जाऊ शकता आणि कधी त्या ठिकाणी गर्दी कमी असेल.
या ऋतूमध्ये जा तिरुपती बालाजीला
तिरुपती बालाजी येथील असणाऱ्या हवामानाचा गर्दीवर परिणाम होतो. उन्हाळ्यात विशेषतः मे आणि जूनमध्ये येथे येणाऱ्यांची संख्या कमी असते त्यावेळी येथे आद्रता जास्त असते. पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये येथे गर्दी काही प्रमाणात कमी असते. पण हा महिने धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या महिन्यात जाणे शक्यतो टाळा. हिवाळ्यात ऑक्टोंबर ते जानेवारी ह्या दरम्यान भाविकांची संख्या येथे वाढलेली असते कारण येथील हवामान चांगले असते.
महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा
तिरुपती बालाजी ला जाण्यासाठी महिन्याचा दुसरा आणि चौथ्या आठवड्यात जावे. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यात येथे गर्दी जास्त असते. या काळात तिरुपती जवळून येणाऱ्या भाविकांची संख्या ही वाढलेली असते.
शनिवारी आणि रविवारी तिरुपतीमध्ये जास्त गर्दी असते. या दोन दिवसांमध्ये असे दिसून आले आहे की बहुतेक लोक मंदिरात दर्शनासाठी येतात. या व्यतिरिक्त सोमवार आणि गुरुवार दरम्यान मंदिरात जाण्याचा विचार तुम्ही करू शकता. विशेषतः सोमवारी आणि बुधवारी लोकांची संख्या ही कमी असते.