तालिबानच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट, 14 भारतीयांना बेड्या

| Updated on: Aug 21, 2021 | 4:58 PM

आसाम पोलिसांनी तालिबानच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल 14 लोकांना अटक केली आहे. सिंह यांनी सांगितलं की या आरोपींनी देशातील कायद्यांचं उल्लंघन केलं आहे. आसाम पोलिसांनी लोकांना दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

तालिबानच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट, 14 भारतीयांना बेड्या
अटकेचा प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नवी दिल्ली : तालिबानच्या (Taliban) समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट (Social Media Post) लिहिण्याच्या आरोपाखाली आसामधील वेगवेगळ्या भागातील 14 जणांना अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री हे अटकसत्र सुरु करण्यात आलं. तालिबानंचं समर्थन करणाऱ्या पोस्ट लिहिणाऱ्या सर्व आरोपींवर बेकायदेशीर वर्तन, आयटी अॅक्ट आणि सीआरपीसी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Assam police arrest 14 for writing posts on social media in support of Taliban)

विशेष डीजीपी जी.पी. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार आसाम पोलिसांनी तालिबानच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल 14 लोकांना अटक केली आहे. सिंह यांनी सांगितलं की या आरोपींनी देशातील कायद्यांचं उल्लंघन केलं आहे. आसाम पोलिसांनी लोकांना दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

वादग्रस्त पोस्टवर आसाम पोलिसांची नजर

एका अन्य पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिस सतर्क आहेत. सोशल मीडियावर जे वादग्रस्त पोस्ट टाकत आहेत, त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे. पोलिसांनी सांगितलं की, कामरुप मेट्रोपॉलिटन, बारपेटा, धुबरी आणि करीमगंज जिल्ह्यातून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसंच दरांग, कछार, हैलाकांडी, दक्षिण सलमारा, गोलपारा आणि होजई या जिल्ह्यातूनही काही आरोपींना अटक केली गेलीय. उप महानिरीक्षक वायलेट बरुआ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाम पोलीस सोशल मीडियावर तालिबानच्या समर्थनात करण्यात आलेल्या पोस्टबाबत कठोर कारवाई करत आहेत. कारण, या गोष्टी राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात आहेत.

हशमत गनी यांची तालिबानशी हातमिळवणी

अफगाणिस्तानात तालिबानराज आल्यानंतर देश सोडून पळून गेलेले राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांच्या भावाने वेगळाच पवित्रा घेतला आहे. अशरफ गनी यांच्याप्रमाणे त्यांच्या भावानेही अफगाणिस्तानच्या नागरिकांना धोका दिला आहे. कारण हशमत गनी यांनी तालिबानशी हातमिळवणी केल्याचं वृत्त समोर आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, हशमत गनी यांनी तालिबानी नेता खलील-उर-रहमान (Khalil-ur-Rehman) आणि धार्मिक नेता मुफ्ती महमूद जाकीर (Mufti Mahmood Zakir) यांनी तालिबानला समर्थन देण्याची घोषणा केली.

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी हे देश सोडून पळून गेले. सध्या ते कुटुंबासह संयुक्त अरब अमीरात (UAE) इथे एका हॉटेलमध्ये(Ashraf Ghani in UAE) आहेत. काबूल सोडल्यानंतर ते शेजारील देश ताजिकिस्तानमध्ये जात होते. मात्र तिथे त्यांचं विमान लँड करण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे यूएईला जावं लागलं.

संबंधित बातम्या :

Afghanistan Photo : पोलादी हातात चिमुकली बाळं, सैन्यांकडून लेकरांसाठी छातीचा कोट, हृदय पिळवटून टाकणारे फोटो

अमेरिकेच्या सैन्यावर केलेला हल्ला सहन करणार नाही, बायडन यांचा तालिबानला इशारा

Assam police arrest 14 for writing posts on social media in support of Taliban