ED अधिकाऱ्याने मागितली तीन कोटींची लाच…आठ किलोमीटर पाठलाग करुन….

bribe Crime | ईडीच्या अधिकाऱ्याने एका डॉक्टराकडून तीन कोटींची लाच मागितली. ही लाच तीन कोटींची होती. लाचेसाठी शेवटी सेटेलमेंट झाले. मग ठरलेल्या रक्कमेचा पहिला हप्ता देण्यात आला. लाचेचा दुसरा हप्ता घेताना मात्र थरार घडला.

ED अधिकाऱ्याने मागितली तीन कोटींची लाच...आठ किलोमीटर पाठलाग करुन....
bribe-moneyImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 11:45 AM

चेन्नई | 2 डिसेंबर 2023 : लाच प्रकरणाचा थरार समोर आला आहे. राज्यात केंद्र सरकारकडून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्रात गाजत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयातील (ED ) तामिळनाडूमधील एका अधिकाऱ्याचे लाचेचे प्रकरण समोर आले आहे.  तामिळनाडूमधील या अधिकाऱ्याने तब्बल तीन कोटी रुपयांची लाच मागितली. लाचेसाठी सेटेलमेंट झाले. मग ठरलेल्या रक्कमेचा पहिला हप्ता देण्यात आला. लाचेचा दुसरा हप्ता घेताना मात्र थरार घडला. तामिळनाडू पोलिसांनी त्या अधिकाऱ्यास पकडण्यासाठी आठ किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला. शेवटी लाच घेताना रंगेहात पकडले. अंकीत तिवारी असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

मागितले तीन कोटी पण…

२९ ऑक्टोंबर रोजी एका प्रकरणासाठी एका डॉक्टराने अंकीत तिवारी याच्याशी फिर्यादीने संपर्क केला. त्यावेळी तिवारी याने त्याच्याकडून तीन कोटी रुपयांची लाच मागितली. शेवटी ५१ लाख रुपयांमध्ये सेटलमेंट झाली. ५१ लाखे रक्कमेतील पहिला हप्ता देण्यात आला. दुसरा २० लाख रुपयांचा हप्ता देताना थरार घडला. तामिळनाडू पोलिसांनी तिवारी याला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. त्याच्यावर पाळत ठेवली गेली. शेवटी आठ किलोमीटरपर्यंत त्याचा गाडीचा पाठलाग करुन त्याला रंगेहात पडकण्यात आले.

असा केला पाठलाग

अंकीत तिवारीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. साध्या कपड्यांमध्ये मध्य प्रदेश पासिंग असलेली गाडी घेऊन तामिळनाडू पोलीस थांबले. लाचेची रक्कम घेतल्यानंतर तिवारी निघाला. त्याची गाडी थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. परंतु तो सुसाट निघाला होता. टोल प्लॉजावर त्याच्या गाडीला रोखण्यासाठी सूचना करण्यात आली. शेवटी टोल प्लॉजावर अंकीत तिवारी याच्या गाडीला घेरण्यात आले. त्याच्या गाडीतून २० लाख रुपये जप्त करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

कार्यालयात छापे

अंकीत तिवारी याला लाच घेताना पकडल्यानंतर त्याचा कार्यालयात पोलीस पोहचले. त्यांनी त्याच्या कार्यालयात तपासणी केली. तसेच त्याच्या घराची तपासणी सुरु करण्यात आली आहे. अंकीत तिवारी ईडीच्या मुदराई कार्यलयात कार्यरत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.