Target Killing in Jammu Kashmir : टार्गेट किलिंगची धास्ती! 2 वर्षांत 11 हिंदू मारले, 3000 हिंदूंनी रातोरात काश्मीर सोडले
target killing in jammu kashmir : काश्मिरात तब्बल 8 हजार कर्मचारी आहे. त्यातील 1800 कर्मचारी आपल्या कुटुंबासह राहत आहेत. काहींच्या कुटुंबात तीन तर काहींच्या कुटुंबात चार सहस्य आहेत.
नवी दिल्ली : एकाच दिवसात काश्मिरातील तब्बल 1 हजार 800 पंडितांसह 3 हजारहून अधिक हिंदूंनी (Hindu in Kashmir) काश्मीर (Kashmir Tagret Killing News) सोडल्याचं वृत्त समोर येतंय. त्यामुळे काश्मिरातील हिंदू वस्त्या पुन्हा ओस पडू लागल्या आहेत. काश्मिरात होत असलेल्या टार्गेट किलिंगला घाबरुन अखेर काश्मिर (Jammu Kashmir News) सोडण्याचा निर्णय बहुतांश हिंदू कुटुंबीयांनी घेतला आहे. गेल्या 20 दिवसांपासून तीव्र निदर्शनं काश्मिरात टार्गेट किलिंग विरोधात कऱण्यात आली होती. सरकारकडेही मदतीची याचना करण्यात आली होती. हिंदू शिक्षिकेच्या हत्येनंतर बँक मॅनेजरच्या हत्येनं संपूर्ण काश्मिरातील हिंदू धास्तावल्याचं चित्र दिसून आलंय. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तीव्र खदखद मांडली जात असताना केंद्री सरकारने नेमके काय प्रयत्न केले? असा सवालही उपस्थित केला जातोय. जून 2020 पासून ते 31 मे पर्यंत तब्बल 11 हिंदूंची हत्या काश्मिरात झाली आहे. दोन वर्षांपूर्वी 2020 मध्ये अनंतनागध्ये सरपंच अजय पंडिता याची हत्या करण्यात आली होती. तर आता गेल्या आठवड्याभरात एका हिंदू शिक्षिकेसह एका बँक मॅनेजरच्या हत्येनं खळभल उडाली आहे.
काश्मिरात तब्बल 8 हजार कर्मचारी आहे. त्यातील 1800 कर्मचारी आपल्या कुटुंबासह राहत आहेत. काहींच्या कुटुंबात तीन तर काहींच्या कुटुंबात चार सहस्य आहेत. जवळपास तेराशे कर्मचाऱ्यांची व्यवस्था ही ट्रान्झिट कॅम्पमध्ये करण्यात आलेली होती. तर बाकीचे कर्मचारी भाड्याच्या घरांत वास्तव्यास होते. मात्र आता टार्गेट किलिंगच्या घटनांची वाढती दहशत पाहता केंद्र सरकार सुरक्षेच्या बाबतीत अपयशी ठरल्याची टीका होऊ लागली आहे. यामुळेच 1800 हिंदू कुटुंबीयांनी काश्मीर सोडलंय.
काश्मीर फाईल्सने दहशत वाद्यांना उकसावलं?
गेल्या काही दिवसांपासून काश्मिरची शांतता भंग पावली आहे. हिंदूंच्या टार्गेट किलिंगचा मुद्दा सोशल मीडियातही गाजतोय. अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. द कश्मीर फाईल चित्रपटावरुन मोधा वाद झाला होता. मात्र आता काश्मिरात सुरु असलेलं टार्गेट किलिंग पाहून चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री गेले कुठे? असा सवाल सोशल मीडियातून उपस्थित केला जातोय.
सध्या काश्मिरात काय स्थिती?
काश्मिरात सध्या जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आलेत. कुणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. वाढत्या टार्गेट किलिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.