Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर इंडियासमोर संकट, 200 जणांची सामूहीक सुटी, 80 पेक्षा जास्त विमाने रद्द

Air India Flights Status: एअर इंडियामधील 200 जणांनी आजारपणाची रजा घेतल्यामुळे 80 पेक्षा जास्त विमाने रद्द करावी लागली. यामुळे प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी फ्लाइटची माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

एअर इंडियासमोर संकट, 200 जणांची सामूहीक सुटी, 80 पेक्षा जास्त विमाने रद्द
Air India (file photo)
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 11:41 AM

एअर इंडिया एक्स्प्रेससमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. एअर इंडियाचे वरिष्ठ क्रू-मेंबर्सने एकाच वेळी सुटी घेतली आहे. एअर इंडियामधील 200 जणांनी आजारपणाची रजा घेतल्यामुळे 80 पेक्षा जास्त विमाने रद्द करावी लागली. यामुळे प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी फ्लाइटची माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केबिन-क्रू कर्मचारी नसल्यामुळे अनेक विमानांची उड्डाने रद्द करावी लागली आहे. विमाने रद्द झाल्यामुळे प्रवाशांना पूर्ण परतावा देण्यात येणार असल्याचे एअर लाईन्सकडून स्पष्ट करण्यात आले.

तिकीटाचे रिफंड पूर्ण देणार

टाटा ग्रुपची एअरलाईन्स एअर इंडियामध्ये संकट निर्माण झाले आहे. अनेक जणांना एकाच वेळी सुटी घेतल्यामुळे विमानांचे उड्डान रद्द करावी लागली आहेत. यासंदर्भात बोलताना एअर इंडियाचे प्रवक्ताने सांगितले की, आमच्या अनेक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सुटी घेतली आहे. त्यानंतर विमानांच्या उड्डानांमध्ये उशीर होत आहे. काही विमाने रद्द करावी लागली आहे.

विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइट चेक करा

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आमच्या क्रू मेंबर्ससोबत चर्चा करत आहोत. विमानांचे उड्डान रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्यांची तिकीटाचे पूर्ण रिफंड मिळणार आहे. तसेच कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आपला प्रवास रिशेड्यूल्ड करता येईल. तसेच बुधवारी विमानतळावर जाण्यापूर्वी एअरलाईन्सला संपर्क करुन फ्लाइटसंदर्भात माहिती घ्यावी, असे आवाहन विमान कंपनीने केले आहे.

हे सुद्धा वाचा

एअर इंडियाकडे 70 विमाने

एअर इंडिया एक्स्प्रेसकडे सध्या 70 विमाने आहेत. एअर इंडियाकडून दर आठवड्याला 2500 उड्डाने होतात. बहुतांशी विमान उड्डान भारतातील मध्य-पूर्व क्षेत्र भागात होतात. एअर इंडिया पुढील 15 महिन्यात 50 पेक्षा जास्त विमाने खरेदी करण्याची तयारी करत आहेत. तसेच पुढील पाच वर्षांत 170 नॅरो-बॉडी विमाने एअर इंडियामध्ये येणार आहेत.

टाटा ग्रुपच्या विस्तारा या एअरलाईन्सने मागील महिन्यात 110 उड्डाने रद्द केली होती. तसेच 160 पेक्षा जास्त विमाने लेट झाली होती. विस्तार एअरलाईन्समध्ये सध्या पायलटची कमतरता आहे. जोपर्यंत पालयटची कमतरता दूर होणार नाही, तोपर्यंत कमी फ्लाइटचे उड्डाण होणार आहे.

'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.