देशात प्रथमच खासगी कंपनी हवाईदलासाठी विमाने बनवणार, भारतातील सर्वात विश्वासार्ह कंपनी बनवणार C-295 एअरक्राफ्ट

PM Narendra Modi: C-295 विमान 844 मीटर ते 934 मीटर लांबीच्या रनवेवरुन उड्डान घेऊ शकते. त्याला उतरण्यासाठी फक्त 420 मीटरचा रनवे लागतो. त्यात सहा हार्ड पॉइंट्स आहेत. म्हणजेच शस्त्रे आणि संरक्षण यंत्रणा बसवण्याची जागा आहे.

देशात प्रथमच खासगी कंपनी हवाईदलासाठी विमाने बनवणार, भारतातील सर्वात विश्वासार्ह कंपनी बनवणार C-295 एअरक्राफ्ट
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 11:03 AM

PM Narendra Modi: लष्कारातील उत्पादने ‘मेड इन इंडिया’ करण्याचे धोरण मोदी सरकारने आखले आहे. यामुळे भारतीय लष्कारातील उत्पादने खासगी कंपन्याही आता विकसित करु लागल्या आहेत. देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख असलेल्या टाटा समूह हवाईदलासाठी विमाने बनवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज सोमवारी टाटा एअरक्रॉप्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करत आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनणार आहे. भारत आणि स्पेन दरम्यान 56 विमाने बनवण्याचा करार झाला आहे. त्यातील 16 विमाने स्पेनमध्ये तयार होणार आहे. त्यानंतर 40 विमाने टाटा एडवान्स सिस्टम्स लिमिटेड गुजरातमधील वडोदरा येथे बनवणार आहे.

का होती C295 विमानांची गरज?

टाटा एडवान्स सिस्टम्स लिमिटेड विमान बनवणारी देशातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे. C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची गरज भारतीय हवाईदलास होती. त्यामाध्यमातून सैनिक, शस्त्रास्त्रे, इंधन एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेते येणार आहे. C295 कमी वजनाच्या सामग्रची वाहतूक करणार आहे.

हे सुद्धा वाचा

अशा आहेत सुविधा

C-295 विमान दोन व्यक्ती उडवू शकतात. त्यात 73 सैनिक किंवा 48 पॅराट्रूपर्स बसू शकतात. तसेच 12 स्ट्रेचर इंटेसिव्ह केयर मेडवॅक किंवा 27 स्ट्रेचर मेडवॅकसोबत 4 मेडिकल अटेंडेंट प्रवास करु शकतात. हे एअरक्रॉप्ट जास्तीत जास्त 9250 kg वजन घेऊन जाऊ शकते. त्याची लांबी 80.3 फूट, विंगस्पॅन 84.8 फूट आणि उंची 28.5 फूट आहे. या एअरक्राफ्टमध्ये 7650 लिटर इंधन येते. 482 km/hr वेगाने ते उडू शकते. त्याची रेंज 1277 ते 4587 किमी आहे. त्यात किती वजन आहे, त्यावर रेंज ठरणार आहे. जास्तीत जास्त 13,533 फूट उंच ते जाऊ शकते.

लहान रनवे वरुन उड्डान

C-295 विमान 844 मीटर ते 934 मीटर लांबीच्या रनवेवरुन उड्डान घेऊ शकते. त्याला उतरण्यासाठी फक्त 420 मीटरचा रनवे लागतो. त्यात सहा हार्ड पॉइंट्स आहेत. म्हणजेच शस्त्रे आणि संरक्षण यंत्रणा बसवण्याची जागा आहे. दोन्ही पंखाखाली प्रत्येकी तीन किंवा इनबोर्ड पाइलॉन्स असू शकतात. ज्यामध्ये 800 किलो वजनाची शस्त्रे बसवता येतील.

टाटाने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून 40 विमानांसाठी मेटल कटिंगचे काम सुरू केले आहे. हैदराबाद सध्या त्याचे मुख्य काम सुरु आहे. अनेक भाग या ठिकाणी साठवले जात आहेत. टाटाचे हैदराबाद केंद्र विमानाचे प्रमुख भाग तयार करेल. त्यानंतर त्याला वडोदरा येथे पाठवले जाईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.