प्रियकराला भेटण्यासाठी जयपूरमधून निघाली, पण ती पाकिस्तानात पोहोचलीच नाही; काय झालं तिचं पुढे?
या पाकिस्तानी तरुणाने तिचा ब्रेन वॉश केला होता. विमानतळावर जाऊ काय बोलायचं हे तिला शिकवलं होतं. विमानतळ कर्मचाऱ्यांनी तिचा मोबाईल ताब्यात घेतला असून तो सीज केला आहे.
जयपूर | 30 जुलै 2023 : पाकिस्तानची सीमा हैदर प्रियकराला भेटायला भारतात आली. त्यानंतर भारतातील अंजू पाकिस्तानात तिच्या प्रियकराला भेटायला गेली. या दोघींच्याही चर्चा जोरात सुरू आहेत. सोशल मीडियावरून त्यांच्याबद्दल रोज काही ना काही माहिती येत असते. या दोन्ही तरुणींची लव्ह स्टोरी दोन्ही देशात चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता आणखी एका अल्पवयीन मुलीचं प्रेमप्रकरण उजेडात आलं आहे. जयपूरचीही मुलगी. तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी विमानतळावर गेली. पण ती पाकिस्तानात जाऊ शकली नाही. अगदी घराच्यांशीही ही मुलगी भांडली होती. पण पाकमध्ये जाण्याचं तिचं स्वप्न भंगलं आहे.
राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील श्रीमाधोपूर येथील ही मुलगी रहिवाशी आहे. शुक्रवारी दुपारी ही 17 वर्षाची मुलगी दोन मुलांसह जयपूर विमानतळावर पोहोचली. विमानतळावर गेल्यावर तिने पाकिस्तानला जाण्याचं तिकीट मागितलं. विमानतळ कर्मचाऱ्यांना ती मस्करी करत असल्याचं समजलं. मात्र, तिने आपण पाकिस्तानी आहोत. आत्यासोबत तीन वर्षापूर्वी भारतात आले होते.
सीकरच्या श्रीमाधोपूर येथे राहत होते, असं तिने सांगितलं. काही दिवसांपूर्वी आत्याशी झगडा झाला. त्यामुळे मी घर सोडलं. बसमध्ये बसून जयपूरला पोहोचले, असंही तिने स्पष्ट केलं. तिच्यासोबतच्या दोन मुलांनीही आम्ही हिला बसमध्ये भेटलो. तिची विचारपूस केली. त्यानंतर तिला विमानतळावर सोडण्यासाठी इथे आलो, असं या मुलांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
या मुलीने आधी ती लाहौरच्या जववळील इस्लामाबाद येथील राहणारी असल्याचं सांगितलं. त्यानंतर विमानतळ कर्माचाऱ्यांनी महिला केंद्रावरील महिलांना स्टाफला बोलावून या मुलीची चौकशी केली. या चौकशीतून ती सीकरमधील श्रीमाधोपूर येथील रहिवाशी असल्याचं कळलं. तिची अधिक चौकशी केली असता इन्स्टाग्रामवर तिची लाहौरमधील तरुणाशी मैत्री झाल्याचं स्पष्ट झालं. असलम लाहोरी असं या युवकाचं नाव आहे. या दोघांच्या मैत्रीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. एवढेच नव्हे तर तिच्या शाळेतील इतर मुलींचीही असलमशी मैत्री आहे.
ब्रेन वॉश केला
या पाकिस्तानी तरुणाने तिचा ब्रेन वॉश केला होता. विमानतळावर जाऊ काय बोलायचं हे तिला शिकवलं होतं. विमानतळ कर्मचाऱ्यांनी तिचा मोबाईल ताब्यात घेतला असून तो सीज केला आहे. तिचा मोबाईल चेक केला जाणार आहे. या मुलीच्या कुटुंबीयांना तिची माहिती दिली आहे. ही मुलगी पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय विमानतळावर आली होती.
त्यामुळे तिचे कुटुंबीय तिचे कागदपत्र घेऊन जयपूर विमानतळावर येत आहेत. आपली मुलगी पाकिस्तानात कुणाला तरी भेटायला निघाली आहे हे त्यांना माहीतच नव्हते. ही मुलगी अभ्यासात प्रचंड हुशार असल्याचं सांगितलं जात आहे. ती बारावी पास आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीचे वडील सैन्यात आहेत. मात्र, त्याचा अधिकृत खुलासा झालेला नाही. एक वर्षापूर्वी ही मुलगी पाकिस्तानी तरुणाच्या संपर्कात आली. या तरुणाच्या संपर्कात इतर कोणत्या कोणत्या मुली होत्या, याचाही तपास केला जात आहे.