Gujrat riots:तिस्ता सेटलवाड यांनी रचला होता गुजरात सरकार पाडण्याचा कट, 20 वर्षांपूर्वी अहमद पटेल यांच्याकडून घेतले होते 30 लाख, कोर्टात SITचा दावा

इतकेच नाही तर या कटात त्यावेळी गुजरातचे पोलीस महासंचालक आर बी श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट हेही सामील असल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या सगळ्यांनी मिळून त्यावेळी नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्थिर करण्याचा कट रचल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

Gujrat riots:तिस्ता सेटलवाड यांनी रचला होता गुजरात सरकार पाडण्याचा कट, 20 वर्षांपूर्वी अहमद पटेल यांच्याकडून घेतले होते 30 लाख, कोर्टात SITचा दावा
तिस्ता सेटलवाड अडचणीत Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 3:47 PM

अहमदाबाद – 2002 साली गुजरात दंगलींनंतर सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्याचा कट रचला होता. यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असलेल्या दिवंगत अहमद पटेल यांच्याकडून 30 लाख रुपये घेतले होते. हा धक्कादायक उल्लेख एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. गुजरात दंगल प्रकरणात तिस्ता यांची काय भूमिका होती, याची चौकशी करणाऱ्या एसआयटीने या प्रकरणात आपले प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. त्यात हा उल्लेख करण्यात आला आहे. इतकेच नाही तर या कटात त्यावेळी गुजरातचे पोलीस महासंचालक आर बी श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट हेही सामील असल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या सगळ्यांनी मिळून त्यावेळी नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्थिर करण्याचा कट रचल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

तिस्ता आणि सहकाऱ्यांना दोनदा मिळाला निधी

तिस्ता यांना सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांच्याकडून पहिल्यांदा ५ लाख तर नंतर दुसऱ्यांदा २५ लाख रुये मिळाल्याचा उल्लेखही एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात आहे. गुजरात दंगल प्रकरणात अटकेत असलेल्या तिस्ता यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना एसआयटीने हा दावा केला आहे. गुजरात एसआयटीच्या पथकाने २५ जून रोजी तिस्ता यांना मुंबईतून अटक केली होती.

काँग्रेसचा कट उघड झाला -भाजपा

आता एसआयटीने हा दावा केल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर ह्ललाबोल केला आहे. गुजरात दंगलीच्या काळात नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा काँग्रेसचा कट यानिमित्ताने उघड झाला आहे, सत्य समोर आले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिली आहे. तिस्ता आणि त्यांचे सहकारी हे मानवतेसाठी नव्हे तर राजकीय अजेंड्यासाठी काम करत असल्याचेही एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेले आहे. गुजरातचे सरकार अस्थिर करणे आणि नरेंद्र मोदींसारख्या निरपराध व्यक्तींना या दंगल प्रकरणात गोवण्याचा हा प्रयत्न असल्याचे पात्रा यांनी म्हटले आहे. अहमद पटेल यांनी फक्त पैशांची डिलिव्हरी केली होती, असा आरोप करत त्यांनी यात सोनिया गांधींनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मोदींना बदनाम करण्यासाठी आणि त्यांचा अपमान करण्यासाठी, सोनिया गांधी यांनी त्यानंतरही कोट्यवधी रुपये दिले असतील असा आरोप पात्रा यांनी केला आहे. राहुल गांधी यांना प्रमोट करण्यासाठीही तिस्ता यांचा वापर करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे.

आरोपांचे निवडणूक कनेक्शन, पटेल यांच्या मुलीचा दावा

गुजरात निवडणुकांच्या आधी हे होणारच होते, असे अहमद पटेल यांची कन्या मुमताज पटेल यांनी म्हटले आहे. या प्रकरणाला आता २० वर्षे उलटली. माझे वडील जेव्हा जिवंत होते, तेव्हा कारवाी का झाली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आता निवडणुकांसाठी हे आरोप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दीड वर्षांपासून अहमद पटेल यांना बदनाम करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

भाजपा मेलेल्या माणसांनाही सोडत नाही- काँग्रेस

भाजपाच्या सर्व आरोपांना फेटाळतो, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. २००२ साली झालेल्या दंगलीनंतर नरेंद्र मोदी यांना तत्ताकीलन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्माची आठवण करुन दिली होती, असेही रमेश म्हणाले. पंतप्रधानांच्या राजकीय बदल्याची मशीन मेलेल्या लोकांनाही सोडत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. एसआयटी त्यांच्या बोलवत्या धन्याच्या इशाऱ्याने नाचत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

खोटी कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा

गुजरात दंगल प्रकरणात तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि माजी पोलीस महासंचालत आर बी श्रीकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटी कागदपत्रे तयार करुन कट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजीव भट्ट जेलमध्येच आहेत. आता श्रीकुमार आणि तिस्ता यांनाही अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात नुकत्याच लागलेल्या निकालानंतर तिस्ता यांच्या भूमिकेच्या चौकशीचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.