Bihar Election Result : तेजस्वी भवः बिहार!; तेजप्रताप यादव यांच्या शुभेच्छा
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यास अवघे काही तास बाकी असतानाच राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर आतापासूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. (tejaswi bhava tej pratap yadav reaction on bihar election result)
बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यास अवघे काही तास बाकी असतानाच राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर आतापासूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यांचे मोठे बंधू तेजप्रताप यादव यांनी तेजस्वी भव: बिहार असं ट्विट करून तेजस्वी यादव यांच्यासह बिहारमधील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. (tejaswi bhava tej pratap yadav reaction on bihar election result)
तेजप्रताप यादव यांनी ट्विट करून तेजस्वी भव: बिहार असं म्हणत तेजस्वी यादव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, काल तेजस्वी यादव यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने बिहारच्या रस्त्यारस्त्यावर त्यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लागले होते. त्यात त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असाच करण्यात आला होता. निकालांच्या आधीच राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री घोषित करत पोस्टर्समधून शुभेच्छा दिल्या आहेत.
तेजस्वी भवः बिहार!
— Tej Pratap Yadav (@TejYadav14) November 10, 2020
राऊतांचे चिमटे
तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही ट्विट करून भाजपला चिमटे काढले आहेत. बादशाह तो वक्त होता है… इन्सान तो युं ही गुरुर करता है, असा टोला राऊत यांनी भाजपला नाव न घेता लगावला आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी केलेल्या या ट्विटमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 10, 2020
महाआघाडी आघाडीवर
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलानुसार तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. त्यात आरजेडी 27, काँग्रेस 6, जेडीयू 11 आणि भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यांच्या घरासमोर जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, तेजस्वी यादव हे राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) पारंपरिक मतदारसंघ असलेल्या राघोपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तेजस्वी यादव यांची सध्याची लोकप्रियता पाहता राघोपूरमधून ते विक्रमी मताधिक्याने विजयी होणार का, हे पाहावे लागेल.
2014 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?
राजद – 80 काँग्रेस – 27 जदयू – 71 भाजप – 53 लोजप – 2 रालोसप – 2 हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1 एकूण जागा – 243
संबंधित बातम्या:
Tejashwi Yadav LIVE News and Updates: तेजस्वी भवः बिहार…. तेज प्रताप यादवांना विजयाचा विश्वास
Tejashwi Yadav: तेजस्वी यादव कोणत्या मतदारसंघातून लढतायत; कोण आहेत प्रतिस्पर्धी उमेदवार?
(tejaswi bhava tej pratap yadav reaction on bihar election result)