हैदराबाद : सासू सुनेच्या नात्यात कधी प्रेम-आपुलकी पाहायला मिळते, तर कधी पूर्वापार चालत आलेल्या विळा-भोपळ्याच्या नात्याचाही प्रत्यय आपल्याला येतो. तेलंगणातील सासूने कोरोनाच्या माध्यमातून आपला सूड उगवला. आपल्यासोबत सुनेलाही कोरोनाची लागण व्हावी, अशी सासूची विकृत इच्छा होती. त्यामुळे तिने सूनबाईंना मिठी मारुन संसर्ग पसरवला. (Telangana Corona Positive Mother in law hugs Daughter in law to infect)
तेलंगणातील धक्कादायक प्रकार
तेलंगणातील राजन्ना सिरीसिल्ला जिल्ह्यातील एलेरेड्डीपेटा गावात ही घटना घडली. कोरोना संसर्गाच्या काळात माणुसकीचं दर्शन दुर्लभ होत असल्याचं ऐकायला मिळतं. जिथे सख्ख्या नात्यातील माणसंच जीवावर उठतात, तिथे अनोळखी माणसांबाबत काय बोलावं. एलेरेड्डीपेटा गावातील राजण्णाचा विवाह थिम्माप्पूर येथील एका महिलेबरोबर झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. राजण्णा 7 महिन्यांपूर्वी नोकरीसाठी ओदिशाला गेला होता. तिथे तो ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करतो.
सुनेला इमोशनल ब्लॅकमेल
राजण्णाची बायको, मुलं आणि सासूसोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी सासूला कोरोनाची लागण झाली. तिला होम क्वारंटाईन करुन घरीच उपचार सुरु करण्यात आले. मात्र आपल्यापासून सून दुरावा (फिजिकल डिस्टन्सिंग) ठेवत असल्याचं तिला पाहावलं नाही. “माझ्या जीवाचं काही बरंवाईट झालं, तर तू सुखाने जगू शकशील का?” असा प्रश्न विचारत तिने सून आणि नातवंडांना भावनिक केलं. तिने सूनेला अनेक वेळा जवळ येण्यास भाग पाडून मिठ्या मारल्या, उद्देश हाच की तिलाही संसर्ग व्हावा.
कोरोनाग्रस्त सुनेला घराबाहेर काढलं
धक्कादायक म्हणजे सूनेला कोरोनाची लागण झाल्यानंतर सासूने तिला घराबाहेर काढले. अखेर तिने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन हा प्रकार सांगितला. सासूमुळेच आपल्याला संसर्ग झाल्याचं तिने सांगितलं. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली. सासूवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
संबंधित बातम्या :
आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू, वीस दिवसात वडिलांचं निधन, कोरोनाने कुटुंब संपवलं
Genelia Deshmukh: मुलाला कोरोनाची लागण; आई म्हणून जेनेलियाला काय वाटलं?; व्हिडीओतून केलं मन मोकळं
(Telangana Corona Positive Mother in law hugs Daughter in law to infect)