रेल्वे इंजिनाचे तापमान 55 डिग्रीवर, धावत्या ट्रेनमध्ये लोको पायलटची प्रकृती बिघडली, अडीच तास स्टेशनवर थांबली रेल्वे

Heat Wave: देशात सर्वत्र तीव्र उष्ण वारे वाहत आहे. राजस्थानमधील तापमान ५० अंश सेल्सियसवर गेले आहे. दिल्लीच्या तापमानाने उच्चांक गाठला. महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमान ४५ अंशावर आहे. यामुळे या भागात जमावबंदी लागू केली आहे.

रेल्वे इंजिनाचे तापमान 55 डिग्रीवर, धावत्या ट्रेनमध्ये लोको पायलटची प्रकृती बिघडली, अडीच तास स्टेशनवर थांबली रेल्वे
तापमान
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 10:50 AM

सध्या देशात सर्वत्र तापमान वाढले आहे. अनेक शहरांमधील पारा 45 अंशाचा वर गेला आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील तापमान 47 डिग्री सेल्सियसवर गेले आहे. तापमानामुळे लोकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. या तापमानाचा फटका मालगाडीमधील लोको पायलटला बसला. इंजिनमधील तापमान 55 डिग्री सेल्सियसवर गेल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. या तापमानात सतत 9 तास काम केल्यानंतर लोको पायलट विनोद कुमार महोबा यांची प्रकृती बिघडली. त्यांना उलटी आणि चक्कर आले. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. या प्रकारामुळे रेल्वे स्टेशनवर अडीच तास मालगाडी थांबून होती.

महोब स्टेशनवर मालगाडी थांबवली

लोको पायलटची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी रुग्णवाहिका पोहचली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे महोबा स्टेशनवर मालगाडी अडीच तास थांबली होती. दुसरा लोका पायलट आल्यानंतर गाडी पुन्हा मार्गस्थ झाली. ही मालगाडी झाशीवरुन निघाली होती. ती बांदा येथे जात होती. मालगाडीच्या इंजिनमधील तापमान 55 डिग्रीवर गेल्याचे सांगण्यात येत आहे. सोबत असणारे लोको पायलट गगन सैनी याने सांगितले की, उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी विनोद कुमार हे दहा लिटर पाणी पिऊन गेले होते. त्यानंतर त्यांना उन्हाचा फटका बसला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली घटनेची माहिती

मालगाडी महोबा स्टेशनच्या आधी कुलपहाड स्टेशनवर असताना विनोद कुमार यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर सैनी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सैनी यांना कोणत्याही परिस्थितीत मालगाडी महोबा स्टेशनवर आणण्याचे सांगितले. सैनी यांनी त्या परिस्थितीत गाडी महोबा स्टेशनवर आणली. त्यानंतर विनोद कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

हे सुद्धा वाचा

देशात सर्वत्र तीव्र उष्ण वारे वाहत आहे. राजस्थानमधील तापमान ५० अंश सेल्सियसवर गेले आहे. दिल्लीच्या तापमानाने उच्चांक गाठला. महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमान ४५ अंशावर आहे. यामुळे या भागात जमावबंदी लागू केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.