Udaipur Murder Case: उदयपूर हत्या प्रकरणानंतर परिसरात तणाव, दुकानं बंद, व्यापाऱ्यांकडून निदर्शने

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशभरात वाद सुरू आहे. मयत कन्हैयालालने नुपूर शर्माच्या बाजूने पोस्ट टाकली होती. तेव्हापासून त्याला धमक्या येत होत्या. जबाबदारी घेत व्हिडीओ जारी करणाऱ्या दोन तरुणांनी नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचाही हवाला दिला जात आहे.

Udaipur Murder Case: उदयपूर हत्या प्रकरणानंतर परिसरात तणाव, दुकानं बंद, व्यापाऱ्यांकडून निदर्शने
उदयपूर हत्या प्रकरणानंतर परिसरात तणावImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 12:08 AM

उदयपूर : उदयपूरमधील हत्येनंतर परिसरात तणावा (Tension)चे वातावरण निर्माण झाले आहे. एका शिंप्याची हत्या (Murder) केल्यानंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कन्हैयालाल टेलर असे हत्या करण्यात आलेल्या शिंप्याचे नाव आहे. या हत्येच्या निषेधार्थ परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांनी शहरात जुलूस काढून देहली गेट चौकात निदर्शने (Protest) केली. हत्येनंतर काही वेळातच दोन तरुणांनी एक व्हिडिओ जारी केला आणि धारदार शस्त्रे दाखवून हत्येची जबाबदारी स्वीकारली. यानंतर लोकांनी तीव्र निषेध नोंदवला. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

शहरातील सर्वात गजबजलेल्या मालदास स्ट्रीट येथे ही घटना घडली. मयत युवक कन्हैयालाल टेलर त्याच्या टेलरिंगच्या दुकानात होता. यावेळी दोन तरुण धारदार शस्त्रे घेऊन आले आणि त्यांनी कन्हैयालाल यांच्यावर हल्ला केला. यावेळी आजूबाजूचे लोक कन्हैयालालच्या बचावासाठी येण्याआधीच आरोपी पळून गेले. याबाबत घंटाघर पोलिसांना महिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल होताच व्यापाऱ्यांनी विरोध केला. एवढेच नाही तर दुकान तात्काळ बंद करण्यात आली. सायंकाळपर्यंत मालदास रस्त्यावर मोठा जमाव जमला आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

नुपूर शर्माच्या समर्थनात पोस्ट लिहिल्याने हत्या

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशभरात वाद सुरू आहे. मयत कन्हैयालालने नुपूर शर्माच्या बाजूने पोस्ट टाकली होती. तेव्हापासून त्याला धमक्या येत होत्या. जबाबदारी घेत व्हिडीओ जारी करणाऱ्या दोन तरुणांनी नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचाही हवाला दिला जात आहे. या घटनेनंतर एकामागून एक असे तीन व्हिडिओ जारी करण्यात आले. यामध्ये घटनेच्या 15 दिवस आधी पहिला व्हिडीओ बनवण्यात आला होता, ज्यामध्ये तरुणाची हत्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. दुसरा व्हिडिओ या हत्येचा लाईव्ह होता, ज्यामध्ये तरुणाची धारदार शस्त्राने हत्या कशी करण्यात आली हे स्पष्ट दिसत आहे. तर तिसऱ्या व्हिडीओमध्ये व्हिडीओमध्ये दोन तरुणांनी हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. (Tensions in Udaipur after youths murder, shops closed, protests by traders)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.