गाझियाबाद- दिल्लीत पाळीव कुत्र्यांकडून होत (attack by pet dogs)असलेल्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. गुरुवारी गाझियाबादच्या संजयनगर उद्यानात खेळत असलेल्या 10 वर्षांच्या मुलावर पिटबुल कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात हा 10 वर्षांचा मुलगा (10 year old boy)गंभीर जखमी (serious injured)झाला आहे. कुत्र्याने त्याच्या चेहऱ्याचे लचके तोडले आहेत. काही दिवसांपूीर्वीच गाझियाबादमध्ये एका सोसायटीच्या लिफ्टमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याने एका लहान मुलाला चावा घेतला होता. या कुत्र्याची मालकीणही त्याच्यासोबत होती. मात्र या कुत्र्याच्या मालकणीने हा हल्ला रोखण्यासाठी काहीही केले नाही, इतकेच काय तर नंतर त्या मुलाचीही मदत केली नव्हती.
गुरुवारी झालेल्या घटनेत पिटबुल कुत्र्याने 10 वर्षांच्या लहानग्याला चावले आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या चेहऱ्यावर 100 टाके घालण्यात आले आहेत. पीडित कुटुंबीयांनी आरोप केला आहे की एक अल्पवयीन मुलगी हा कुत्रा घेऊन उद्यानात आली होती. त्याचवेळी या कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केला.
नोएडातील दुसऱ्या एका घटनेत सोसायटीत डिलिव्हरी बॉयवर कुत्र्याने लिफ्टमध्ये हल्ला केला होता. अपोलो फार्मसीचा डिलिव्हरी बॉय औषधे पोहचवण्यासाठी चालला होता. त्याच्याआधी लिफ्टमध्ये एक मालक त्याच्या कुत्र्यासह होता. दरवाजा उघडताच या कुत्र्याने हा डिलिव्हरी बॉयवर हल्ला केला. दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण होते आहे.