भयंकर शिक्षा, अशाही असतात आया.. होमवर्क केले नाही म्हणून हात-पाय बांधून तळपत्या उन्हात लहानगीला ठेवले छतावर. दुपारच्या उन्हात तळमळत राहिली मुलगी..
ही मुलगी उन्हाने होरपळत असल्याचे आणि ओरड़त असल्याचेही या व्हिडीओत स्पष्टपणे दिसते आहे. पुन्हा अशी चूक करणार नाही, असे म्हणत ती आईची माफी मागतानाही या व्हिडीओत दिसते आहे.
नवी दिल्ली – साधा होमवर्क केला नाही म्हणून एका आईने आपल्या लहान मुलीला अशी शिक्षा दिली आहे की ते पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल. सोशल मीडियावर या आईच्या राक्षसीपणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. लहानग्या मुलीचे हात पाय बांधून तिला भर दुपारी घराच्या छतावर झोपवून ठेवल्याची भयानक शिक्षा या आईने मुलीला दिली आहे. लहानगी त्या भयानक उन्हाळ तळमळत असल्याचेही या व्हिडीओत दिसते आहे. ही मुलगी उन्हाने होरपळत असल्याचे आणि ओरड़त असल्याचेही या व्हिडीओत स्पष्टपणे दिसते आहे. पुन्हा अशी चूक करणार नाही, असे म्हणत ती आईची माफी मागतानाही या व्हिडीओत दिसते आहे.
#horryfying #Disgusting This is regarding #Video of a baby girl circulating on Social Media wherein the girl is seen tide on the roof. the address and the family has been traced. Reason क्लास का होमवर्क नही किया था @DCPNEastDelhi #Delhi pic.twitter.com/Qp6HjPrpRc
हे सुद्धा वाचा— Ravi Jalhotra (@ravijalhotra) June 8, 2022
व्हिडीओ पाहून थरकाप उडेल
जेव्हा आईने अशी शिक्षा देून या लहानगीला छतावर झोपवले होते, तेव्हा उन्हाच्या तडाख्याने ही मुलगी किंचाळत होती. तिची आरडाओरड ऐकून शेजारचे त्यांच्या घरांच्या छतांवर पोहचले. त्यांनी हा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर टाकला. या व्हिडीओत उष्णतेमुळे या मुलीची पाठ किती भाजून निघत असेल हे स्पष्टपणे दिसते आहे. पाठ वाचवण्यासाठी ती कमरेवर उभी राहण्याचा प्रयत्न करतेय. तर कधी उजव्या तर कधी डाव्या बाजूला वळण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा व्हिडीओ पाहून युझर्स या मुलीसाठी चिंतेत आहेत. आईच्या या वागण्यावर प्रश्न उपस्थित करीत आहेत.
थोड्या वेळात तिला खाली आणले होते, आईची सारवासारव
हा सगळा प्रकार दिल्लीतल्या तूकमीरपूर गल्ली क्रमांक २ मधील आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली. पोलीस जेव्हा या मुलीच्या घरी पोहचले तेव्हा आईने सांगितले की तिने होमवर्क केले नव्हते. त्यामुळे ५ ते ७ मिनिटे तिचे हातपाय बांधून घराच्या छतावर तिला झओपवले असल्याचे आईने मान्य केले आहे. अशी शिक्षा केल्यानेच ती वेळेवर होमवर्क करेल, असेही तिच्या आईने सांगितले. काही वेळाने तिला हात पाय सोडून घरात आणल्याचेही या आईने सांगितले आहे. अशा क्रूर आया कशा काय असू शकतात असा प्रश्नही उपस्थित करण्यात येतो आहे.