Ajmal Kasab : मृत्यूपूर्वी अजमल कसाबने मागितले 2 टोमॅटो, अजब मागणीचं कारण काय?
Terrorist Kasab : 26 नोव्हेंबर 2008 साली 10 दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून नृशंस हल्ला केला. त्यामध्ये शेकडो निरपराधांचा बळी गेला. यामध्ये 9 दहशतवादीही मारले गेले तर एकमेव हल्लेखोर, अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आलं. त्याला काही वर्षांनी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली. मात्र मृत्यूपूर्वी अजमल कसाबने एक अजब मागणी केली होतीस, त्याने 2 टोमॅटो मागितले होते. काय होतं त्यामागचं कारण ?

तब्बल 17 वर्षांपूर्वी 10 दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून अनेक ठिकाणी गोळीबार करत, बॉम्ब फेकत दहशतवादी हल्ला केला होता. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात 160 पेक्षा अधिक निरपराध नागरिक मारले गेले तर जखमींची गणतीच नाही. या हल्ल्याला कित्येक वर्ष उलटून गेली असली तरी त्याच्या जखमा अजूनही ताज्याच आहेत, ते व्रण कधीच न भरणारे आहेत. शेकडो निरपराध्यांचे बळी घेणारी ती काळरात्र आजही कोणीच विसरू शकत नाही. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि देशाचा सर्वात मोठा शत्रू तहव्वूर राणाचे नुकतेच भारतात प्रत्यार्पण झाले. मुंबईकरांवर नृशंस हल्ला करून अनेकांचा बळी घेणाऱ्या 10 दहशतावाद्यांपैकी 9 दहशतवादी मारले गेले तर एकमेव हल्लेखोर, अजमल कसाब याला पोलिसांच्या असीम धैर्यामुळे जिवंत पकडण्यात आलं.
ज्या 10 दहशतवाद्यांना देशाच्या आर्थिक राजधानीत हाहाकार माजवला, त्यामध्येच अजमल आमिर कसाबचाही समावेश होता. या हल्याच्या काही वर्षानंतर खटला चालवून अजमल कसाब याला फाशीची शिक्षा देण्यात आली. मात्र फासावर चढण्यापूर्वी अजमल कसाब याने एक अजब मागणी केली होती. त्याने मृत्यूपूर्वी दोन टोमॅटोची मागणी केली होती. मात्र त्याने
जुहू चौपाटीवरून कसाबला केली होती अटक
मुंबई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी जुहू चौपाटीवरून कसाबला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, शस्त्र कायदा, स्फोटके कायदा यासह अनेक कायद्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. 2009 ते 2010 पर्यंत विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी चालली. त्यानंतर, 3 मे रोजी न्यायालयाने शिक्षा सुनावताना अजमल कसाबला मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी दोषी ठरवले आणि 6 मे रोजी त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.
कसाबचे शेवटचे शब्द काय होते ?
फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कसाबने दया याचिकेसाठी अपील केले होते, परंतु ती फेटाळण्यात आली. चार वर्षे चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर, अखेर 21 नोव्हेंबर 2012 साली सकाळी 7.30 वाजता पुण्यातील येरवडा तुरुंगात त्याला फाशी देण्यात आली. मी अल्लाहची शपथ घेतो की अशी चूक पुन्हा कधीही होणार नाही, अल्ला मला माफ कर, असे मृत्यूपूर्वी कसाबचे शेवटचे शब्द होते
मृत्यूपूर्वी मागितले 2 टोमॅटो
मिळालेल्या माहितीनुसार, कसाबला फाशीची माहिती एक दिवस आधी (मंगळवारी)देण्यात आली होती, त्यानंतरही तो शांत होता. सकाळी सहा वाजता उठल्यावर त्याने प्रथम नमाज पठण केले आणि नंतर तुरुंग अधिकाऱ्यांकडून दोन टोमॅटो मागितले. पण, त्याने टोमॅटोची मागणी का केली हे कळू शकले नाही. पण मृत्यूपूर्वी त्याने 2 टोमॅटो मागितले असता, जेलमधील अधिकाऱ्यांनी त्याला एक टोपलीभरून टोमॅटो आणून दिले. कतसाबने त्यातील 2 टोमॅटो उचलले, आणि त्या दोनपैकी एक टोमॅटो खाल्ला. पण त्याने नेमके टोमॅटो का मागितले, याचे कारण त्याच्या मृत्यूसोबतच गेलं, ते आता कधीच समजू शकणार नाही.