Terrorist arrested : जम्मूत अटकेतील दहशतवादी निघाला भाजपच्या सोशल मीडिया सेलचा प्रमुख, ऑनलाईन नोंदणीचा दुष्परिणाम असल्याचं भाजपचं स्पष्टीकरण
जम्मू-काश्मिरमधील भाजपचे अध्यक्ष रवींद्र रैना यांच्यासोबत शाहचे छायाचित्र आहेत. रेसी जिल्ह्यातील तुस्कानच्या गावकऱ्यांनी दहशतवाद्याची माहिती पोलिसांना दिली. त्यांना जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर यांनी नगदी दोन लाख रुपयांचं बक्षीस दिलंय.
मुंबई : तालिब हुसैन शाह (Talib Hussain Shah) आणि त्याचा साथीदाराला जम्मू काश्मिरमधील एका गावात आज सकाळी अटक करण्यात आली. शाह हा लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी आहे. तो भाजपचा सक्रिय सदस्य होता. शिवाय जम्मूत पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्च्याच्या सोशल मीडियाचा इनचार्ज (Social Media Cell) असल्याचं समोर आलंय. त्यांच्याकडं दोन एके रायफल्स, ग्रॅनाईड आणि शस्त्रसाठा सापडला. हा सर्व शस्त्रसाठी पोलिसांनी जप्त केला. कोणत्याही व्यक्तीची पार्श्वभूमी न तपासता सदस्यता दिल्यानं हा घोळ झाल्याचं पक्षानं स्पष्टीकरण भाजपनं दिलंय. या अटकेमुळं नवीनच समस्या निर्माण झाली आहे, असं पक्षाचे प्रवक्ते आर. एस. पठानिया (R. S. Pathania) म्हणाले. भाजपात प्रवेश करण्याचा हा एक मॉडल असल्याचं दिसतं. सदस्यत्व मिळवायचं. रेकी करायची आणि नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न करायचं. हा प्रयत्न पोलिसांनी हानून पाडल्याचं पठानिया यांनी सांगितलं.
Hats off to the courage of villagers of Tuksan, in #Reasi district . Two #terrorists of LeT apprehended by villagers with weapons; 2AK #rifles, 7 #Grenades and a #Pistol. DGP announces #reward of Rs 2 lakhs for villagers. pic.twitter.com/iPXcmHtV5P
हे सुद्धा वाचा— ADGP Jammu (@igpjmu) July 3, 2022
शाह 9 मेपासून आयटी सेलचा प्रमुख
सीमेवर दहशत पसरविणारे पक्षाचे ऑनलाईन सदस्य होऊ शकतात. ऑनलाईन सदस्य नोंदणीचा हा दुष्परिणाम आहे. ऑनलाईन सदस्य नोंदणी करणाऱ्या सदस्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जाऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. 9 मे रोजी शाहला पक्षाच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलचा इनचार्ज करण्यात आलंय. राजौरी जिल्ह्यातील द्राज कोट्रांका बुधन येथील तालिब हुसैन शाह रहिवासी आहे. तो दोन महिन्यांपूर्वी जम्मूतील भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्च्याचा आयटी आणि सोशल मीडियाचा इंन चार्ज आहे.
weapons recovered pic.twitter.com/MiYngkJUi5
— ADGP Jammu (@igpjmu) July 3, 2022
भाजपच्या नेत्यांसोबत शाहचे फोटो
जम्मू-काश्मिरमधील भाजपचे अध्यक्ष रवींद्र रैना यांच्यासोबत शाहचे छायाचित्र आहेत. रेसी जिल्ह्यातील तुस्कानच्या गावकऱ्यांनी दहशतवाद्याची माहिती पोलिसांना दिली. त्यांना जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर यांनी नगदी दोन लाख रुपयांचं बक्षीस दिलंय. एनडीटीव्हीनं यासंदर्भात वृत्त दिलंय. शाहचा दोन ते तीन बाँबब्लास्टमध्ये सहभाग असल्याची माहिती आहे.